मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

धक्कादायक! चीनने खाण्यासाठी विकली कोरोना संक्रमित जनावरं; रिपोर्टमधून झाली पोलखोल

धक्कादायक! चीनने खाण्यासाठी विकली कोरोना संक्रमित जनावरं; रिपोर्टमधून झाली पोलखोल

कोरोनाव्हायरसबाबत 
चीनमधील धक्कादायक रिपोर्ट

कोरोनाव्हायरसबाबत चीनमधील धक्कादायक रिपोर्ट

Coronavirus in China : व्हायरसमुळे माणसांचा जीव धोक्यात घालण्याची तयारी चीनने खूप वर्षे आधीपासूनच केली होती.

  • Published by:  Priya Lad
बीजिंग, 18 ऑगस्ट :  कोरोनाव्हायरस (Coronavirus) नेमका आला कुठून याचा अद्यापही शोध सुरूच आहे. संशयाची सुई तर चीनकडेच आहे (Coronavirus in China), जिथं सर्वात आधी कोरोनाचा विस्फोट झाला. याचदरम्यान आता एक धक्कादायक रिपोर्ट समोर आला आहे. ज्याच चीनने खाण्यासाठी कोरोना संक्रमित जनावरं विकली (Coronavirus infected animal), असा दावा करण्यात आला आहे.

व्हायरसमुळे माणसांचा जीव धोक्यात घालण्याची तयारी चीनने खूप वर्षे जवळपास 11 वर्षे आधीपासूनच केली होती.  चीनने 38  जंगली जनावरांच्या (Wild Animals) प्रजातींना बाजारात खाण्यासाठी विकलं ज्यांच्यामध्ये कोरोनाव्हायरस होते, असं या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. रिपोर्टमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे की जंगली प्राण्यांच्या शरीरात आजारांचे व्हायरस सोडूनन त्यांना संक्रमित करण्यात आलं. त्यानंतर त्यांना वुहान मीट मार्केटमध्ये (Wuhan meat market)  विकण्यात आलं. प्राण्यांमध्ये जे व्हायरस सोडण्यात आले, त्यामध्ये कोरोनाव्हायरसही होता. हे वाचा - Corona Vaccine Side Effects: कोरोना लशीमुळे पक्षाघाताचा धोका? संशोधनातून धक्कादायक माहिती उघड चीन, ब्रिटन आणि कॅनडाच्या संशोधकांनी मिळून हा रिपोर्ट तयार केला आहे. वर्षभरापूर्वीच हा रिपोर्ट तयार करण्यात आला होता. आता तो ऑनलाईन पब्लिश करण्यात आला आहे. 38 प्रजातींच्या 47000 प्राण्यांवर अभ्यास करण्यात आला ज्यांना बाजारात विकलं जातं. यापैकी बहुतेक आधीपासूनच संक्रमित असतात. या प्राण्यांमध्ये एनफ्लुएंझा, रेबीज आणि इतर व्हायरसमुळे आजार आधीपासूच असतात. जर नीट काळजी घेतली नाही, स्वच्छता बाळगली नाही तर हे आजार हे प्राणी खाणाऱ्यांपर्यंत पोहोचतात. चीनमधील वाइल्डलाइफ रिसोर्सेस कंझर्व्हेशन (Southwest China Wildlife Resources Conservation), ब्रिटनची ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी (University of Oxford) आणि कॅनडातील कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या  ( University of British Columbia) संशोधकांनी वुहान मार्केटचे फोटो आणि हुनान सीफूड मार्केटचा डेटा एकत्र करून रिपोर्ट तयार केला आहे. हे वाचा - Delta Variant ची दहशत! एक कोरोना रुग्ण सापडताच संपूर्ण देश लॉकडाऊन या संशोधनाचे प्रमुख संशोधक चीनचे डॉक्टर शाओ शाओ यांनी वुहानच्या मार्केटमधून मे  2017 ते नोव्हेंबर 2019 या कालावधीत डेटा जमा केला होता. जानेवारी 2020 कोरोनाव्हायरस पसरू लागला तेव्हा शाओ यांनी इतर शास्त्रज्ञांसह हा अभ्यास पुढे नेला. फेब्रुवारी 2020 मध्ये एका सायन्स जर्नलमध्ये हा रिपोर्ट प्रसिद्ध कऱण्यासाठी पाठवण्यात आला होता. पण दोन वेळा रिजेक्ट करण्यात आला. जागतिक आरोग्य संघटनेलाही हा रिपोर्ट पाठवण्यात आला, पण वर्षभर त्याच्याकडे कुणी लक्ष नाही दिलं.
First published:

Tags: China, Coronavirus, Wuhan

पुढील बातम्या