जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / दिलासादायक! Corona संसर्गाच प्रमाण घटलं, तर बरे होणाऱ्यांची संख्या वाढली, मृत्यूदरही नियंत्रणात

दिलासादायक! Corona संसर्गाच प्रमाण घटलं, तर बरे होणाऱ्यांची संख्या वाढली, मृत्यूदरही नियंत्रणात

दिलासादायक! Corona संसर्गाच प्रमाण घटलं, तर बरे होणाऱ्यांची संख्या वाढली, मृत्यूदरही नियंत्रणात

Maharashtra covid 19 situation कोरोनाग्रस्त रुग्णांच्या रोज्या संख्येत घट होत आहे. त्याचबरोबर रुग्ण बरे होण्याचं प्रमाणदेखिल वाढलं आहे, त्यामुळं प्रशासनाला काहीसा दिलासा मिळत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 3 मे : राज्यातली कोरोनाची (coronavirus) स्थिती हळू हळू नियंत्रणात येत असल्याचं पाहायला मिळत आहे. एकिकडं कोरोनाग्रस्त रुग्णांच्या रोजच्या संख्येत घट होत आहे. त्याचबरोबर रुग्ण बरे होण्याचं प्रमाणदेखील (recovery rate increased) वाढलं आहे, त्यामुळं प्रशासनाला काहीसा दिलासा मिळत आहे. तसंच मृत्यूचा आकडाही कमी होत असल्यामुळं तीही दिलासादायक बाब आहे. तसंच लागण होण्याचं प्रमाणही (positivity rate) घटलं आहे. (वाचा- कोरोना रुग्णांवर आता आयुर्वेदिक औषधाने उपचार; AYUSH 64 घेण्याचा सरकारचा सल्ला ) कोरोनाची रोजची रुग्णसंख्या आणि कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या यावरून एकूण परिस्थिती लक्षात येत असते. विशेष म्हणजे आता हळू हळू कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या ही कोरोनाची लागण होणाऱ्यांच्या तुलनेत वाढायला लागल्याचं चित्र समोर येत आहे. सोमवारचा विचार करता. सोमवारी राज्यात नव्या कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा हा 48621 एवढा आहे. मात्र त्याचवेळी सोमवारी कोरोनावर मात केलेल्या रुग्णांचा आकडा हा 59500 एवढा आहे. त्यामुळं प्रशासनासाठी ही आनंदाची बाब आहे. आतापर्यंत राज्यातील एकूण 40,41,158 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण (Recovery Rate) 84.7 टक्के झाला आहे. (वाचा- ‘आपण सर्व एकत्र आलो तर चांगला लढा देऊ’; 2024 लोकसभासाठी ममतांचा एल्गार ) राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या पॉझिटिव्हिटी रेटमध्येही गेल्या काही दिवसांत सातत्यानं घट होत असल्याची पाहायला मिळत आहे. सोमवारी 2,78,64,426 नमुन्यांपैकी 47,71,022 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. म्हणजे एकूण चाचण्यांपैकी 17.12 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. हा पॉझिटिव्हिटी रेट हळू हळू कमी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. म्हणजे कोरोनाची लागण होण्याचं प्रमाण घटलं आहे. कोरोनाचा रिकव्हरी रेट वाढत आहे तर पॉझिटिव्हिटी रेट कमी होत आहे. त्याचबरोबर कोरोनाचा मृत्यूदरही हळूहळू कमी होत असल्याचं स्पष्ट झालं आहे. राज्यात सोमवारी 567 कोरोना रुग्णांता मृत्यू झाला. तर राज्यातील कोरोनाचा मृत्यूदर हा 1.49 टक्के एवढा आहे. सध्या राज्यात 39,08,491 रुग्ण होम क्वारंटाईनमध्ये तर 28,593 संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या सध्या 6,56,870 एवढी आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात