कोलकाता, 3 मे : पश्चिम बंगाल (West Bengal) जिंकल्यानंतर आता ममता बॅनर्जींनी दिल्लीकडे (New Delhi) मोर्चा वळवलाय. 2024 मध्ये लोकसभा निवडणुका (2024 Loksabha Election) ममता बॅनर्जींना खुणावू लागल्या आहेत. ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी याच पार्श्वभूमीवर सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहन विरोधकांना केलंय. तसं झाल्यास आपण 2024 च्या युद्धात जोरदार लढा देऊ असं म्हणत ममता बॅनर्जी यांनी जणू 2024 च्या लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे. (वाचा- निवडणुकीनंतर या राज्यांत कोरोनाचा विस्फोट; राज्यासह केंद्राचंही टेन्शन वाढलं ) पश्चिम बंगामध्ये मिळवलेल्या एकतर्फी विजयानंतर ममता बॅनर्जींचा आत्मविश्वास चांगलाच दुणावला आहे. पश्चिम बंगालमध्ये झालेली ही निवडणूक प्रामुख्यानं भाजप विरुद्ध तृणमूल अशीच लढली गेली. त्यामुळं भाजपचा पराभव करणं शक्य असल्याची जाणीव ममता यांनाही झाली आहे. त्यामुळंच रविवारी विजय मिळवल्यानंतर सोमवारी जणू ममता बॅनर्जी यांनी 2024 च्या युद्धासाठीही एल्गार पुकारला आहे. (वाचा- Corona काळात धनंजय मुंडेंचा दिव्यांगांसाठी मोठा निर्णय, तुम्हीही कराल कौतुक ) काय म्हणाल्या ममता… ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे की, मी केवळ रस्त्यावर लढणारी एक व्यक्ती आहे. मी लोकांना भाजपच्या विरोधात लढण्यासाठी प्रोत्साहीत करू शकते. पण एखादा व्यक्ती एकटा सर्वकाही करू शकत नाही. मला वाटतं आपण सर्व जण मिळून 2021 च्या युद्धात लढा देऊ शकतो. या वक्तव्यातून ममता बॅनर्जी यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकांसाठी जणू रणशिंगच फुंकलं आहे. कोविडचा लढा महत्त्वाचा ममता बॅनर्जी यांनी 2024 च्या निवडणुकांबाबत संकेत दिले असले तरी त्यांनी प्राथमिकता कोरोनाला असल्याचं म्हटलं आहे. 2024 चं युद्ध आपण लढू शकतो पण आधी कोरोनाच्या विरोधात लढुया असं म्हणत ममता बॅनर्जींनी कोरोनाचा सामना करणं आधी गरजेचं असल्याचं म्हटलं आहे. पश्चिम बंगालमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. निवडणुकांनंतर ही वाढ झपाट्यानं वाढल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळं आधी कोरोनाचा निपटारा करायचा असल्याचं ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत. ममता बॅनर्जी यांना पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगालच्या जनतेनं एकहाती सत्ता दिली आहे. भाजप सत्तेचा दावा करत असताना ममतांना तिसऱ्यांना मतदारांनी निवडून दिलं. त्यामुळं ममता बॅनर्जी यांनी लगेचच भाजप आणि केंद्र सरकारच्या विरोधात हल्लाबोल सुरू केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.