जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / कोरोना रुग्णांवर आता आयुर्वेदिक औषधाने उपचार; AYUSH 64 घेण्याचा सरकारचा सल्ला

कोरोना रुग्णांवर आता आयुर्वेदिक औषधाने उपचार; AYUSH 64 घेण्याचा सरकारचा सल्ला

कोरोना रुग्णांवर आता आयुर्वेदिक औषधाने उपचार; AYUSH 64 घेण्याचा सरकारचा सल्ला

AYUSH 64 हे आयुर्वेदिक औषध कोरोना रुग्णांसाठी फायदेशीर ठरत असल्याचा दावा आयुष मंत्रालयाने (Ministry of Ayush) केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 03 एप्रिल : देशातील कोरोना रुग्णांवर उपचारासाठी (Corona Patient treatment) विविध औषधांचा (Corona Medicine) वापर केला जातो आहे. आता आता आयुर्वेदिक औषधाचाही (Ayurvedic medicine for corona) समावेश झाला आहे. आयुर्वेदिक औषध आयुष 64 (AYUSH 64) कोरोना रुग्णांवर प्रभावी ठरत असल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. हे औषध सर्वांना उपलब्ध व्हावं, यासाठी आता सरकारचे प्रयत्न सुरू झाले आहेत. AYUSH- 64 हे  1980 साली तयार करण्यात आलेलं औषधं. मलेरियावर उपचारासाठी या औषधाची निर्मिती करण्यात आली. कोरोना रुग्णांमधील लक्षणं पाहता कोरोना रुग्णांवरही या औषधाची चाचणी करण्यात आली. त्यावेळी हे औषध कोरोनावर प्रभावी ठरत असल्याचं दिसून आलं.

जाहिरात

आय़ुष मंत्रालयाने (Ministry of Ayush) सांगितलं, सौम्य-मध्यम लक्षणं असलेल्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरत असल्याचं दिसून आलं. त्यामुळे कोरोनावर उपचारासाठी हे औषध पुन्हा तयार करण्यात आलं आहे. हे वाचा - निवडणुकीनंतर या राज्यांत कोरोनाचा विस्फोट; राज्यासह केंद्राचंही टेन्शन वाढलं आता या औषधाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जाणार आहे. CCRAS आणि NDRCने याबाबत करार केला आहे. आयुष मंत्रालायने सर्व राज्यांना या औषधाचा सौम्य ते मध्यम कोरोना रुग्णांसाठी वापर करावा, अशा सूचना दिल्या आहेत. देशभरात हे औषध उपलब्ध व्हावं यासाठी औषध कंपन्यांनाही या औषधाच्या निर्मितीसाठी पुढाकार घेण्यास सांगितलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात