LIVE: मुख्यमंत्र्यांकडून निरोप आला म्हणूनच भेटलो- देवेंद्र फडणवीस

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

  • News18 Lokmat
  • | July 30, 2021, 15:54 IST |
    LAST UPDATED 2 YEARS AGO

    हाइलाइट्स

    22:17 (IST)

    सोलापूर - शेकापचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार गणपतराव देशमुख यांचं निधन, वयाच्या 94 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    20:43 (IST)

    राज्यातील बड्या बिल्डर्सना महारेराचा दणका, तब्बल 644 प्रकल्प केले ब्लॅकलिस्ट, 2017 व 2018 मधील ताबा देण्यास असमर्थ ठरलेले प्रकल्प, 644 प्रकल्पांमध्ये 80% प्रकल्प विकले गेले आहेत, या प्रकल्पांना विक्री व जाहिरातीसाठीही घातली बंदी

    20:31 (IST)

    मुंबईत 3 ऑगस्टला शहर व पश्चिम उपनगरात 15 टक्के पाणीकपात; कुर्ला, घाटकोपर, अंधेरी आणि गोरेगावातील काही भागांमध्ये पाणीपुरवठा नाही, पाणी जपून आणि काळजीपूर्वक वापरण्याचं मुंबई महापालिकेचं आवाहन

    20:11 (IST)

    राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या : संजय दैने - महापालिका आयुक्त, मालेगाव महापालिका; अनिल पाटील - सचिव, प्रदेश नियंत्रण प्राधिकरण, मुंबई; सुरेश जाधव - आयुक्त, कामगार महाराष्ट्र राज्य, मुंबई; प्रताप जाधव - उपमहासंचालक, यशदा, पुणे; कुमार खैरे - सहव्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास मंडळ; जी.एम. बोडके - महापालिका आयुक्त, अकोला; एस.जी. देशमुख - अतिरिक्त मुद्रांक नियंत्रक, मुंबई; एम. देवेंद्रसिंह - संचालक, महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे
    राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या : राहुल कर्डिले - सह महानगर आयुक्त, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण; जी.एस. पापळकर - जिल्हाधिकारी, हिंगोली; रुचेश जयवंशी - व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, अकोला; एन.आर. गटणे - महापालिका आयुक्त, नांदेड वाघाळा शहर महापालिका; दीपेंद्रसिंह कुशवाह - सहसचिव (उद्योग), उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय

    19:6 (IST)

    परमबीर सिंगांविरोधातील खंडणीच्या आरोपांच्या प्रकरणात आरोपी असलेले पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांना दिलासा, याचिकेवर 5 ऑगस्टला सुनावणी होईपर्यंत त्यांच्याविरोधात अटकेची कारवाई करणार नसल्याची राज्य सरकारची हायकोर्टात हमी

    18:56 (IST)

    अनिल देशमुखांना ईडीनं बजावला समन्स
    सोमवारी चौकशीला हजर राहण्याचे आदेश
    मुलगा ऋषिकेश आणि पत्नीलादेखील समन्स
    चौकशीला हजर न राहिल्यास कठोर कारवाई?
    अनिल देशमुख परिवार नॉट रिचेबल

    17:48 (IST)

    नाशिकच्या ग्रामीण भागातील 5 शाळा केल्या बंद
    3 शिक्षकेतर कर्मचारी, 2 शिक्षक, 3 विद्यार्थ्यांना लागण
    सिन्नर, मालेगाव, निफाड, देवळा तालुक्यातील शाळा
    जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची माहिती

    17:28 (IST)

    नाशिक - पॉझिटिव्हिटी रेट 2 वर - छगन भुजबळ
    'मंत्रिमंडळ बैठकीत निर्बंध शिथिलतेसंदर्भात चर्चा'
    ब्रिटनमध्ये पुन्हा लॉकडाऊन केलं जातंय - भुजबळ
    केरळमध्ये दोन दिवस पूर्ण लॉकडाऊन - भुजबळ
    'टास्क फोर्स, मुख्यमंत्री सर्व विचार करत आहेत'
    'टास्क फोर्सच्या निर्णयानुसार स्थानिक निर्णय घेऊ'
    आपल्या जिल्ह्यातील परिस्थिती बघून ठरवू - भुजबळ
    'नाशिकमध्ये सध्या आहे तीच परिस्थिती कायम राहील'

    17:19 (IST)

    आता शेतकरी करू शकणार मोबाईल अॅपद्वारे पिकांची नोंदणी, महसूल विभागाचा ई-पीक पाहणी प्रकल्प 15 ऑगस्टपासून राज्यभर

    17:17 (IST)

    नागपूर - वाघांची तस्करी करणाऱ्या आरोपीला अटक
    मध्य प्रदेशच्या बिचवासहानीत वनविभागाची कारवाई
    वाघाचे 4 पंजे, वाघाची पूर्ण कातडी, इतर साहित्य जप्त
    आरोपीनं वाघाची शिकार करून मिळवले होते अवयव
    वनविभागाकडून आरोपीच्या इतर साथीदारांचा शोध

    कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स