• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • LIVE: पूरग्रस्तांना 100 टक्के दिलासा देणारा निर्णय घेणार- विजय वडेट्टीवार

LIVE: पूरग्रस्तांना 100 टक्के दिलासा देणारा निर्णय घेणार- विजय वडेट्टीवार

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | July 28, 2021, 14:52 IST
  LAST UPDATED 6 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  21:42 (IST)

  चिपळूण - 20 नागरिकांची 5 दिवसांनंतर सुटका
  20 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात NDRF ला यश
  इंदापूर गावात दरड कोसळल्यानं संपर्क तुटला होता
  इंदापूर गावातील ग्रामस्थ मदतीच्या होते शोधात
  प्रयत्नांनंतर रिक्टोलीतील सरपंचांचा प्रशासनाशी संपर्क
  संपर्कानंतर NDRF ची टीम मदतकार्यासाठी दाखल
  सर्व नागरिक सुखरूप असल्याची प्राथमिक माहिती

  20:54 (IST)

  कोल्हापूरला रेड अलर्ट असल्यानं मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द, उद्धव ठाकरे पूरग्रस्त भागाची करणार होते पाहणी

  20:14 (IST)

  उद्या मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्ससोबत बैठक
  लॉकडाऊन शिथिलतेबाबत होऊ शकतो निर्णय
  सर्वसामान्यांसाठी लोकलबाबत निर्णय अपेक्षित
  आरोग्य विभागाची उद्या मुख्यमंत्री घेणार बैठक

  19:34 (IST)

  राज्यातील पूरग्रस्तांसाठी तातडीची 10 हजारांची मदत
  सर्व पंचनामे समोर आल्यानंतरच पॅकेजची घोषणा
  5 हजार कोटींपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा अंदाज

  19:33 (IST)

  कोल्हापूर - पुन्हा एकदा जोरदार पावसाचा इशारा
  हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा अंदाज
  5 दिवस कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस
  महापुरातून सावरलेले जिल्हे पुन्हा भीतीच्या छायेत

  19:23 (IST)

  'न्यूज18 लोकमत'च्या पाठपुराव्याला यश
  'खासगी शाळांची 15 टक्के फी कपात होणार'
  राज्य सरकार अध्यादेश काढणार - शिक्षणमंत्री
  शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडांची माहिती
  कोरोनामुळे अडचणीतल्या पालकांना दिलासा

  18:55 (IST)

  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा
  'बँक दिवाळखोरीत गेल्यास ठेवीदारांना 90 दिवसांत पैसे'
  ठेवीदारांच्या आर्थिक संरक्षणासाठी महत्वपूर्ण निर्णय

  17:27 (IST)

  खासगी शाळांच्या फी कपातीवर निर्णय अपेक्षित
  15% फी कपातीबाबत राज्य मंत्रिमंडळात चर्चा
  राज्य सरकार घेऊ शकतो फी कपातीचा निर्णय

  17:2 (IST)

  कोल्हापूर - मंगळवार पेठ परिसरातील घटना
  पन्हाळगड पायथ्याला दुसरं माळीण होताना वाचलं
  पन्हाळ्याची तटबंदी कोसळल्याचं आलं समोर
  3 दिवसांपूर्वी घटना घडल्याचं आलं उघडकीस

  15:55 (IST)

  केंद्रीय गृहमंत्रालयाची कोरोनाबाबत नवी नियमावली
  'सणासुदीच्या काळात नियमांची पायमल्ली नको'
  राज्य सरकारला काळजी घेण्याच्या केंद्राच्या सूचना

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स