LIVE Updates : बैलगाडी शर्यतीबाबत मंत्रालयात बैठक, महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | August 23, 2021, 22:13 IST |
  LAST UPDATED 2 YEARS AGO

  हाइलाइट्स

  22:6 (IST)

  उद्या होणारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक रद्द
  राज्य मंत्रिमंडळाची 26 तारखेला महत्वाची बैठक

  22:4 (IST)

  उद्या बैलगाडा शर्यतीबाबत मंत्रालयात बैठक, मंत्री जयंत पाटलांच्या दालनात महत्वाची बैठक

  21:37 (IST)

  राज्यात डेल्टा प्लसचा धोका आणखी वाढला, राज्यात दिवसभरात आणखी 27 डेल्टा प्लसचे रुग्ण, राज्यातील एकूण डेल्टा प्लसची रुग्णसंख्या 203

  21:37 (IST)

  कोविड विषाणू जनुकीय सूत्र निर्धारण अंतर्गत मुंबईतील पहिल्या चाचण्यांचे निष्कर्ष जाहीर, कोविड चाचणीच्या एकूण 188 
  नमुन्यांमध्ये 'डेल्टा'चे 128 रुग्ण; अल्फा 2, केपा 24 तर इतर सर्वसाधारण प्रकाराचे विषाणू, कोविड प्रतिबंधात्मक निर्देशांचं 
  नागरिकांनी कठोर पालन करण्याचं मुंबई महापालिकेचं आवाहन

  21:1 (IST)

  'केंद्रानं ओबीसींचा इम्पिरिकल डेटा उपलब्ध करून द्यावा'
  राज्य सरकारच्या याचिकेवर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी
  याचिकेवर उद्या सकाळी 10.30 वा. होणार सुनावणी

  20:10 (IST)

  नाशिक - 8 लाख रुपयांचं लाच प्रकरण
  शिक्षणाधिकारी डॉ.वैशाली झनकर-वीर निलंबित
  पोलीस, न्यायालयीन कोठडी सुनावल्यानं कारवाई
  निलंबन काळात खासगी नोकरी-व्यवसायास मज्जाव
  झनकर-वीर यांना आजच जामीन आणि निलंबनही

  19:55 (IST)

  पुण्यात आज कोरोना रुग्णवाढ 100च्या आत
  पुण्यात दिवसभरात 233 कोरोनामुक्त, 10 मृत्यू

  19:52 (IST)

  राज्यात दिवसभरात 6,795 कोरोनामुक्त
  राज्यात दिवसभरात 3,643 रुग्णांची नोंद
  राज्यात दिवसभरात 105 रुग्णांचा मृत्यू
  रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 97 टक्क्यांवर
  राज्यात सध्या 49 हजार 924 अॅक्टिव्ह रुग्ण

  19:36 (IST)

  दुसऱ्या टप्प्यातही जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद - राणे
  या प्रेमामुळे भारावून गेलो आहे - नारायण राणे
  मी जनतेचे प्रश्न समजून घेतोय - नारायण राणे
  कसा मार्ग काढायचा यावर चर्चा करतोय - राणे
  नरेंद्र मोदींकडून आम्हाला प्रेरणा मिळते - राणे
  'पंतप्रधान देशाला महाशक्तीकडे घेऊन जातील'
  'राज्य सरकारनं पूरग्रस्तांच्या पाठीशी उभं राहावं'
  पूरग्रस्तांना अद्याप मदत मिळाली नाही - राणे
  मी गडकरींना दिल्लीला जाऊन भेटणार - राणे
  ...तर कंत्राटदार बदलला पाहिजे - नारायण राणे
  'हिंदूंच्या सणाला विरोध झाला तर सहन करणार नाही'

  18:50 (IST)
  नागपूर विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागप्रमुख ज्योत्स्ना मेश्राम यांची इमारतीच्या नवव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या, आत्महत्येचं कारण अस्पष्ट

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स