liveLIVE NOW

LIVE : मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांनी घेतली गृहमंत्री अमित शहा यांची भेट

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | July 20, 2021, 20:04 IST
  facebookTwitterLinkedin
  LAST UPDATED 2 MONTHS AGO

  AUTO-REFRESH

  HIGHLIGHTS

  22:0 (IST)

  मुंबईकरांसाठी अतिशय महत्वाची बातमी
  मुंबईत 7 दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा
  सरकारी, खासगी रुग्णालयात रक्तसाठा कमी
  रुग्णांचे नातेवाईक करीत आहेत रक्तदान

  21:52 (IST)

  'मनसैनिक' यापुढे 'महाराष्ट्र सैनिक' म्हणून ओळखला जाणार, शिवसेनेत शिवबंधनाची परंपरा आहे तर आता मनसेनं महाराष्ट्र सैनिकाचा बिल्ला लावण्याची नवी परंपरा सुरू केलीय

  21:24 (IST)

  राज्यात दिवसभरात 7,510 कोरोनामुक्त
  राज्यात दिवसभरात 6,910 रुग्णांची नोंद
  राज्यात दिवसभरात 147 रुग्णांचा मृत्यू
  राज्यात सध्या 94 हजार 593 अॅक्टिव्ह रुग्ण
  6 जिल्ह्यांत कोरोनाचा आकडा शून्यावर
  11 जिल्ह्यांत कोरोना रुग्णसंख्या 5 च्या खाली
  कोकण, प.महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक कायम

  20:21 (IST)

  कोल्हापूर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा, 21 आणि 22 जुलैला अतिवृष्टी होणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज, 70 ते 120 मिमी पावसाची शक्यता, पाऊस वाढल्यानं नद्यांची पातळीही वाढणार, त्यामुळे हवामान खात्यानं दिला सावधानतेचा इशारा, डोंगरी भागात भूस्खलन होण्याची भीती

  19:26 (IST)

  कोपरी पुलाच्या मधील दोन मार्गिकांचं काम
  9 महिन्यांत मार्गिकांचं काम पूर्ण करणार
  रेल्वे आणि एमएमआरडीएनं दिली ग्वाही
  नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी केली पाहणी
  बोईसर इथं जाऊन पुलाच्या गर्डर, बीमची पाहणी
  पुलाचे गर्डर आणि बीम तातडीनं ठाण्याला हलवा
  एकनाथ शिंदेंच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना

  19:7 (IST)

  राज ठाकरेंनी घेतली बाबासाहेब पुरंदरेंची भेट, छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातील एका लिखाणाबाबत दोघांमध्ये विस्तृत चर्चा झाली

  18:18 (IST)

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून बकरी ईदच्या शुभेच्छा
  'कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सण घरीच राहून साजरा करा'
  आपलं कुटुंबीय, परस्परांची काळजी घ्या - मुख्यमंत्री
  ''ईद-उल-अजहा' त्याग, समर्पणाचा संदेश देणारा आहे'
  'प्रेरणा घेऊन आपण परस्परांविषयी आदर बाळगूया'
  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून बकरी ईदच्या शुभेच्छा

  18:11 (IST)

  शिक्षक पात्रता परीक्षेचं आयोजन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला मान्यता, शिक्षक पात्रता परीक्षेचं आयोजन 15 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2021 या काळात होणार, गेल्या दोन वर्षांत झाली नव्हती परीक्षा

  18:3 (IST)

  महाराष्ट्रात घरगुती वीज ग्राहकांचे मीटर होणार स्मार्ट
  मुंबईसह प्रमुख महानगरांत बसवणार स्मार्ट मीटर

  17:30 (IST)

  वीज बिलांच्या रिकन्सिलेशनसाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करून 15 ऑगस्टपर्यंत अहवाल सादर करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स