liveLIVE NOW

LIVE Updates: BKC पूल दुर्घटनेची चौकशी करा,एकनाथ शिंदेंचे MMRDA आयुक्तांना आदेश

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | September 17, 2021, 15:54 IST
  facebookTwitterLinkedin
  LAST UPDATED A MONTH AGO

  AUTO-REFRESH

  HIGHLIGHTS

  21:59 (IST)

  10 तासांनंतरही अनिल देशमुखांच्या नागपूरच्या घरी इन्कम टॅक्सची कारवाई सुरू

  21:59 (IST)

  कोरोना प्रतिबंध लसीकरण मोहिमेंतर्गत महापालिकेच्या वतीनं आज मुंबईतील सर्व शासकीय आणि महापालिका कोविड-19 लसीकरण केंद्रांवर फक्त महिलांसाठी राखीव असं विशेष लसीकरण सत्र राबवलं गेलं, त्यानुसार एकूण 1 लाख 7 हजार 934 महिलांना लस दिली गेली, यात महिलांना थेट येऊन लसीची पहिली किंवा दुसरी मात्रा घेण्याची मुभा देण्यात आली होती

  21:34 (IST)

  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरून मानले आभार
  'शुभेच्छा देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे आभार मानतो'
  आपणा सर्वांचे मनापासून आभार - नरेंद्र मोदी
  तुमच्या शुभेच्छा मला कायम प्रेरणादायी - मोदी
  'देशबांधणीच्या कार्यात शुभेच्छा मला बळ देतील'

  20:55 (IST)

  ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ टी. पद्मनाभन यांचं पुण्यात हृदयविकाराच्या झटक्यानं निधन; गुरुत्वाकर्षण, विश्वरचनाशास्त्र या विषयात योगदानाबद्दल जगभर त्यांचं नाव होतं, 2007 साली पद्मनाभन यांना 'पद्मश्री'नं गौरवलं होतं

  20:18 (IST)

  ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत काढलेला अध्यादेश राज्य सरकारनं राज्यपालांकडे पाठवला

  19:54 (IST)

  मृत माओवादी नेता हरिभूषणच्या जहाल माओवादी पत्नीचं तेलंगणा पोलिसांसमोर आत्मसमर्पण

  18:58 (IST)

  राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य बबनराव तायवाडेंचा राज्यपालांकडे राजीनामा, मागासवर्गीयांना 27% आरक्षण देऊ शकत नसल्यामुळे पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही अशी भूमिका, अजूनही एम्पिरिकल डाटा गोळा करण्याची प्रक्रिया नाही

  17:53 (IST)

  आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक
  अजित पवारांच्या नेतृत्वामध्ये लढली जाणार
  'मी माझ्या सहकाऱ्यांसोबत जनतेपुढे पुन्हा येणार'
  उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं स्पष्ट

  17:36 (IST)

  मुंबई महापालिकेचा पाचवा सीरो सर्व्हे जाहीर
  86.64% लोकांमध्ये कोविडविरोधात आढळल्या अँटिबॉडी
  1 आणि 2 डोस घेतलेल्या 90.26% लोकांमध्ये अँटिबॉडी
  लसीकरण न झालेल्यांपैकी 79.86% लोकांमध्येही अँटिबॉडी
  झोपडपट्टी, बिगर झोपडपट्टी परिसरात अँटिबॉडी वाढल्या

  17:30 (IST)

  देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर पार पडली बैठक
  मुंबई मनपा निवडणूक पार्श्वभूमीवर नगरसेवकांची बैठक
  'पालिकेतील भ्रष्टाचारावर अधिक कठोरपणे आवाज उठवा'
  महत्वाच्या बैठकीत देवेंद्र फडणवीसांनी दिले आदेश
  रस्त्यांच्या खर्चावर श्वेतपत्रिका काढण्याची भाजपची मागणी

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स