LIVE: उत्तर प्रदेशातील कावड यात्रा अखेर रद्द; सरकारसोबत चर्चेअंती कावड संघाचा निर्णय

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

  • News18 Lokmat
  • | July 17, 2021, 22:14 IST |
    LAST UPDATED 2 YEARS AGO

    हाइलाइट्स

    20:53 (IST)

    भारतातून युरोपात जाणाऱ्यांसाठी खुशखबर
    कोव्हिशिल्डला 16 युरोपीयन देशांची मान्यता
    आतापर्यंत 40 युरोपीयन देशांकडून मान्यता
    प्रवेश मार्गदर्शक तत्त्वं वेगवेगळी असू शकतात  

    15:40 (IST)

    मुख्यमंत्र्यांची 'प्रोड्युसर्स गिल्ड'च्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा
    चित्रपट निर्मात्यांसोबत व्हिडिओ कॉंन्फरसिंगद्वारे चर्चा
    चित्रपट, मालिकांच्या चित्रीकरणाविषयी दिल्या सूचना
    'कोविडविषयक आरोग्याच्या नियमांची पूर्ण काळजी घ्या'
    कोणताही निष्काळजीपणा परवडणार नाही - मुख्यमंत्री
    'चित्रीकरणाचं स्थळ, वेळेबाबत पोलिसांशी समन्वय ठेवा'
    'कलाकारांसह इतरांची नियमित कोविड तपासणी करावी'
    लसीकरण होईल हे पाहावं; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे निर्देश 

    15:39 (IST)

    पंतप्रधान मोदी - शरद पवार यांची दिल्लीत भेट
    पंतप्रधान कार्यालयात दोघांमध्ये तासभर खलबतं
    दोन दिग्गजांच्या भेटीनं राजकीय चर्चांना उधाण
    मोदी-पवार भेटीबाबत नवाब मलिक यांची माहिती
    दोन दिवसांपासून शरद पवार दिल्लीत - मलिक
    'पियूष गोयल यांनी शरद पवारांची भेट घेतली'
    'संरक्षणमंत्री राजनाथ यांचीही पवारांसोबत बैठक'
    'सीमेवरील परिस्थितीबाबत संरक्षणमंत्र्यांशी चर्चा'
    मोदी-पवार भेटीबाबत नवाब मलिकांचं स्पष्टीकरण
    'मोदींसोबतच्या बैठकीत बँक नियमांबाबत चर्चा'
    'बँकांच्या कायद्यांमध्ये केंद्रानं केलेल्या बदलांवर चर्चा'
    RBIच्या नियमांमुळे सहकारी बँकांना फटका - मलिक
    सहकारी बँकांचे अधिकार मर्यादित झाले - मलिक
    'लसीकरणाची व्यापक मोहीम राबवण्यावर चर्चा'
    'लसींच्या तुटवड्याबाबतही मोदी-पवार बैठकीत चर्चा'
    कोरोना स्थितीवर पवारांची मोदींशी चर्चा - मलिक
    'कोरोनाकाळात सुरू असलेल्या राजकारणावरही चर्चा'
    मोदी-पवार भेटीची मुख्यमंत्र्यांना कल्पना होती -मलिक
    'फडणवीस-पवारांमध्ये कोणतीही भेट झाली नाही' 

    12:57 (IST)

    नाशिक - भाजप कार्यालयात बैठकांचं सत्र
    भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित
    विभागवार बैठका, प्रमुख कार्यकर्ता संवाद
    पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठका

    12:27 (IST)

    पंतप्रधान मोदी-शरद पवार यांची दिल्लीत भेट
    भेटीत राज्यातील काही विषयासंदर्भात चर्चा
    दोघांमध्ये राजकीय विषयावरही चर्चेची माहिती
    पंतप्रधान कार्यालयात दोघांमध्ये एक तास खलबतं

    10:47 (IST)

    पुणे - चाकणमध्ये दुहेरी हत्येमुळे खळबळ
    मुलीला पळवून नेल्याच्या रागातून मारहाण
    बेदम मारहाणीत 2 तरुणांचा मृत्यू
    तरुणीच्या वडिलांसह 6 जण ताब्यात

    10:21 (IST)

    कुरार मेट्रो स्टेशनजवळील घरांवर बुलडोझर
    आमदार भातखळकरांचा कारवाईला विरोध
    भाजप आमदार अतुल भातखळकर ताब्यात
    वनराई पोलिसांची भातखळकरांवर कारवाई

    10:2 (IST)

    निलंबित मुंबई पोलीस अधिकारी सचिन वाझेंची विशेष एनआयए कोर्टात जामीन याचिका दाखल
    जामिनावर सुटण्याची सचिन वाझेकडून कोर्टाला विनंती
    NIAनं अटक केल्यानंतर  90 दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल करता आले नाही.
    सचिन वाझे सध्या तळोजा तुरुंगात

    8:24 (IST)

    'ओबीसी आरक्षणाचा अधिकार राज्यालाच'
    विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं स्पष्ट
    'राज ठाकरेंबाबत योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ'
    महापालिका निवडणुकांना अजून वेळ - फडणवीस

    8:13 (IST)

    लोणावळ्याच्या भुशी डॅमवर पर्यटकांची गर्दी
    जमाबंदीच्या आदेशाला पर्यटकांकडून हरताळ
    जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले होते आदेश

    कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स