LIVE: म्हाडाकडून 8 हजार घरांची लॉटरी

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | August 05, 2021, 15:52 IST |
  LAST UPDATED A YEAR AGO

  हाइलाइट्स

  21:24 (IST)

  यंदाचा गणेशोत्सव राज्य सरकारनं 29 जुलैला जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसारच साजरा होणार, कोरोना संसर्गाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेऊन, सध्याच्या नैसर्गिक आपत्तींच्या प्रसंगात गणेशोत्सव साधेपणानंच साजरा करण्याचा सर्व गणेशोत्सव मंडळांचा एकमतानं निर्णय, मार्गदर्शक सूचनात अंशत: सुधारणा करावी अशी विनंती केली होती, मात्र सरकारकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही

  20:13 (IST)

  कोरोनासंदर्भात महाराष्ट्रासाठी मोठी बातमी
  गोवा हद्दीतून महाराष्ट्रात येताना खोटे RTPCR
  ट्रॅव्हल एजंटच 300 रुपये घेऊन देतात खोटे रिपोर्ट
  जुने रिपोर्टही दाखवून महाराष्ट्रात मिळतोय प्रवेश
  बोगस 'RTPCR'मुळे तिसऱ्या लाटेचा धोका?
  अशानं महाराष्ट्रात कसा रोखणार कोरोना?
  'सिंधुदुर्गचा पालकमंत्री म्हणून सूचना केल्यात'
  असे प्रकार थांबले पाहिजेत - उदय सामंत
  दोषी असणाऱ्यांवर कारवाई होणार - सामंत
  तात्काळ कारवाई करण्याचे दिले आदेश
  'न्यूज18 लोकमत'च्या बातमीचा इम्पॅक्ट

  19:44 (IST)

  पोसऱ्यातील दुर्घटनाग्रस्त 50 लोकांचं अलोरेत स्थलांतर
  घरांमध्ये पाणी, वीज नसल्यानं नागरिकांचे मोठे हाल
  प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका
  19 कुटुंबांमधील जवळपास 50 लोकांची गैरसोय
  हुसेन दलवाईंनी खेडच्या प्रांतांना घेतलं फैलावर

  19:41 (IST)

  राज्यातील शेकडो लोककलावंतांना मुख्यमंत्र्यांचा मोठा दिलासा, कोरोना काळातील आर्थिक संकटातून उभं करण्यासाठी अनुदान देण्यास मान्यता, सांस्कृतिक कार्यमंत्र्यांसोबत झाली बैठक

  19:4 (IST)

  'ईडब्ल्यूएस'साठी घटनात्मक तरतूद शक्य'
  '...तर मराठा आरक्षणासाठी का नाही?'
  अशोक चव्हाणांचं फडणवीसांना प्रतिआव्हान

  18:4 (IST)

  चंद्रकांत पाटील उद्या राज ठाकरेंना भेटणार
  पालिका निवडणुकीच्या दृष्टीनं महत्वाची भेट
  'उद्या सकाळी 11.30 वा. 'कृष्णकुंज'वर भेटणार'
  'माझ्या मनात काही शंका आहेत त्या विचारणार'
  ही युतीची नांदी नाही - चंद्रकांत पाटील
  'राज ठाकरेंनी व्यापक विचार करायला हवा'
  जर-तरला काही अर्थ नाही - चंद्रकांत पाटील
  युती झाली नाही तरी मैत्री राहील - चंद्रकांत पाटील

  17:50 (IST)

  नवीन शैक्षणिक वर्ष कसं असावं याचा अहवाल 15 दिवसांत आमच्याकडे येईल, पण सगळीकडे कॉलेज एकाचवेळी सुरू होतील असं नाही, 15 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरपर्यंत कॉलेज सुरू करावी असा आमचा प्रयत्न आहे - उदय सामंत

  17:44 (IST)

  चंद्रकांत पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी
  'उद‌्भवलेल्या परिस्थितीचा सरकारनं आढावा घ्यावा'
  'सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या करू नयेत'
  'वाढीव बदल्यांसाठी दिलेली परवानगी मागे घ्यावी'
  चंद्रकांत पाटलांचं पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना आवाहन

  17:3 (IST)

  टोकियो ऑलिम्पिक - कुस्ती स्पर्धा
  भारताच्या दीपक पुनियाचा 4-2 नं पराभव
  दीपक पुनियाचं कांस्यपदक हुकलं
  सॅन मारिनोच्या माईल्स अमिनचा विजय

  16:41 (IST)

  टोकियो ऑलिम्पिक - कुस्तीची मेगाफायनल
  रशियाच्या युगुएव झावूरनं पटकावलं गोल्ड
  कुस्तीपटू रविकुमार दहियाला रौप्यपदक
  अटीतटीच्या लढतीत रविकुमार दहिया पराभूत
  रशियाच्या झावूरची रविकुमारवर 7-4 अशी मात
  कुस्तीपटू रविकुमारची 'सुवर्ण'संधी हुकली

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स