आषाढी वारीबाबत वारकरी प्रतिनिधींसोबत चर्चा, 50 लोक पायी वारी करतील अशी मागणी आली मात्र ही संख्या वाढत जाईल ही भीती, वारकरी नियमाप्रमाणे वागतील, इतर भक्तांचं सांगता येत नाही, अधिकाऱ्यांसोबत अजून एक बैठक होईल - अजित पवार
20:26 (IST)
अनलॉकबाबत सीएमच अंतिम निर्णय घेतील - अजित पवार
संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी प्रशासन सज्ज - अजित पवार
'पुणे, पिंपरी-चिंचवडला संसर्ग प्रमाण 5 टक्क्यांखाली'
'सोमवारपासून पुणे, पिंपरी-चिंचवडला शिथिलता'
मात्र ग्रामीण भागात 12% संसर्ग प्रमाण - अजित पवार
'म्युकरमायकोसिसवरील इंजेक्शनची अजूनही कमतरता'
'खडकी, पुणे कँटोन्मेंटमध्ये निर्बंध शिथिल होतील'
20:6 (IST)
मुंबईत दिवसभरात 973 नवीन रुग्ण
मुंबईत दिवसभरात 1207 कोरोनामुक्त
मुंबईत दिवसभरात 24 रुग्णांचा मृत्यू
19:46 (IST)
मराठा आरक्षण प्रकरणी मोठी बातमी
'सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार'
उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाणांची माहिती
भोसले समितीचा अहवाल राज्य सरकारकडे सादर
40 कायदेशीर मुद्यांवर याचिका दाखल करण्याचा होता प्रस्ताव
50% आरक्षणाची अट शिथिल करा यावर याचिका
19:46 (IST)
'सह्याद्री'च्या मुख्य सभागृहाबाहेरील घटना
शोभेचं मोठं झुंबर पीओपी स्लॅबसह कोसळलं
पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे सुखरूप
दुपारी 4.45 वा. प्रकार घडल्याची माहिती
सुदैवानं या दुर्घटनेत कोणीही जखमी नाही
18:24 (IST)
'मुंबई मनपाला लस पुरवठा करण्यास स्पुटनिक तयार'
'रेड्डी लॅबरोटरीबरोबर प्रशासनाची बोलणी यशस्वी'
जूनमध्ये लसीचा पुरवठा करणार - महापौर
8 ते 10 दिवसांत निर्णय होईल - किशोरी पेडणेकर
17:53 (IST)
'मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाल्यानं अनेकांना पोटशूळ'
आमदार विनायक मेटे यांचा घणाघात
कोरोनाचे नियम पाळून उद्याचा मोर्चा निघणारच
आमदार विनायक मेटेंचा आरक्षणासाठी निर्धार
17:52 (IST)
अखेर मुंबई पालिकेचा लसीचं ग्लोबल टेंडर काढण्याचा प्रयत्न फसला, निविदेत सहभाग घेतलेल्या 9 पैकी एकही कंपनी पात्र ठरू शकली नाही, एकाही लस उत्पादक कंपनीचा निविदा प्रक्रियेत सहभाग नव्हता, मुंबईकरांना लवकर लस मिळण्याची आशा संपुष्टात
17:19 (IST)
मराठा आरक्षण प्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या निकालपत्राचा समीक्षा अहवाल राज्य सरकारला सादर
17:18 (IST)
नागपूरच्या पिपला भागात एका पिस्तूलधारकानं बिल्डरच्या कुटुंबाला बनवलं होतं बंधक, लुटीच्या उद्देशानं हा तरुण पिपला फाटा येथील राजू वैद्य यांच्या घरी शिरला होता, दीड तासानंतर पोलिसांनी मोठ्या शिताफीनं बंधक कुटुंबाची केली सुटका
कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स