Live Updates: लसीकरणासाठी प्रत्येक गावाकरिता रणनीती बनवा, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | November 03, 2021, 13:50 IST |
  LAST UPDATED A YEAR AGO

  हाइलाइट्स

  20:52 (IST)
  राहुल द्रविड भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक, बीसीसीआयकडून राहुल द्रविडच्या नावाची घोषणा, आगामी भारत-न्यूझीलंड सीरिजपासून प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळणार
  20:14 (IST)

  केंद्र सरकारची जनतेला दिवाळी भेट
  पेट्रोलचे दर 5 रुपयांनी स्वस्त होणार
  डिझेलचे दर 10 रुपयांनी स्वस्त होणार
  पेट्रोल-डिझेलवरच्या एक्साईज ड्युटीत कपात
  मध्यरात्रीपासून पेट्रोल-डिझेलचे नवे दर लागू

  19:46 (IST)

  उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राज्यातील जनतेला दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा, यंदाची दिवाळी सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, समाधान, आनंद, उत्तम आरोग्य घेऊन येवो, दिवाळीतील दिव्यांच्या रोषणाईनं अंध:कार दूर होऊन सर्वांचं जीवन प्रकाशमय होवो, यंदाची दिवाळी राज्याला कोरोनामुक्तीकडे नेणारी ठरो - अजित पवार

  19:37 (IST)

  दादरा-नगरहवेलीच्या शिवसेना खासदार कलाबेन डेलकर
  कलाबेन डेलकरांनी 'वर्षा'वर घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
  'आमचे निवडणुकीतले मुद्दे घेऊन पुढे जाणार'
  उद्धव ठाकरेंचे धन्यवाद - डेलकर कुटुंबीय
  हा लोकशाहीचा विजय झाला - डेलकर कुटुंबीय

  18:51 (IST)

  सक्तीनं केल्या जाणाऱ्या वीजबिल वसुलीबाबत नाराजी
  केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवारांकडून नाराजी
  'सक्तीनं केली जाणारी वीजबिल वसुली थांबवा'
  कोणाचंही वीज कनेक्शन तोडू नका - डॉ.भारती पवार
  'कोरोना, अतिवृष्टीमुळे शेतकरी अगोदरच अडचणीत'
  'शेतकऱ्याची दिवाळी अंधारात घालवू नका'
  वीज महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या सूचना

  18:36 (IST)
  राज्यातील बोगस बायोडिझेलचा पर्दाफाश, 'न्यूज18 लोकमत'च्या बातमीचा मोठा दणका, नगरमध्येही बायोडिझेलची बेकायदेशीर विक्री, या प्रकरणात सखोल चौकशी करा, आरोपींवर कारवाईची आमदार संग्राम जगतापांची मागणी, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांची भेट घेणार
   
  18:34 (IST)

  राज्यातील बोगस बायोडिझेलचा पर्दाफाश
  'न्यूज18 लोकमत'च्या बातमीचा मोठा दणका
  नगरमध्येही बायोडिझेलची बेकायदेशीर विक्री
  या प्रकरणात सखोल चौकशी करा - संग्राम जगताप
  कारवाईची आमदार संग्राम जगतापांची मागणी
  राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांची भेट घेणार

  18:22 (IST)
  अयोध्येत यंदाची दिवाळी धूमधडाक्यात, लक्ष लक्ष दिव्यांनी उजळली अयोध्या नगरी, रामाच्या नगरीत दीपोत्सव मोठ्या उत्साहात
  17:53 (IST)

  दादरा-नगरहवेलीच्या खासदार कलाबेन डेलकर
  कलाबेन डेलकर वर्षा बंगल्यावर दाखल
  कलाबेन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला
  शिवसेना नेते संजय राऊतही उपस्थित

  17:38 (IST)
  पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देणारे IAF पायलट शौर्यचक्र विजेते विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना ग्रुप कॅप्टन पदावर बढती
   

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स