मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /या जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या सर्वात कमी, तरीही 7 दिवसांचा 'जनता कर्फ्यू'

या जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या सर्वात कमी, तरीही 7 दिवसांचा 'जनता कर्फ्यू'

शहरात सध्या 952 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 492 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

शहरात सध्या 952 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 492 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यात कोरोनाबाधित (Coronavirus) रुग्ण संख्येनं पहिल्यांदा 2 हजाराचा आकडा ओलांडला आहे.

गडचिरोली, 23 सप्टेंबर: गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यात कोरोनाबाधित (Coronavirus) रुग्ण संख्येनं पहिल्यांदा 2 हजाराचा आकडा ओलांडला आहे. तरी जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या राज्यात सर्वात कमी आहे. मात्र, गडचिरोली शहरात वाढलेल्या रुग्ण संख्या पाहाता प्रशासनानं 'जनता कर्फ्यू'ची घोषणा केली आहे. बुधवारपासून जनता कर्फ्यूला सुरुवात झाली आहे.

हेही वाचा..कामगार विधेयक राज्यसभेत मंजूर; ग्रॅच्युटीबरोबरच बदलणार आणखी काही नियम

कोंढाळा वडसा येथील 57 वर्षीय आरोग्य कर्मचाऱ्याचा मंगळवारी कोरोनामुळे मृत्यू झाला. तो चामोर्शी तालुक्यात आरोग्य सेवेत होता. गेल्या 24 तासांत नवीन 93 कोरोनाबाधितांचीही नोंद झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील सक्रिय कोरोनाबाधित संख्या 490 झाली. आत्तापर्यंत एकूण बाधित 2086 रूग्णांपैकी 1582 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आत्तापर्यंत 14 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नवीन 93 बाधितांमध्ये 33 गडचिरोली शहरातील आहेत. या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत कोरोना नियंत्रणासाठी 7 दिवसांचा जनता कर्फ्यु सुरू झाला आहे.

व्यापारी वर्गाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद...

कोरोना नियंत्रणासाठी सुरू करण्यात आलेल्या 7 दिवसांचा जनता कर्फ्युला शहरातील व्यापारी-राजकीय पक्ष आणि जनताकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अशा रीतीने कोरोनाचा वाढता आलेख आता जनसहभागाने रोखणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात आजवर कोरोनाबाधितांनी 2000 चा आकडा पार केला आहे. तर 14 मृत्यूची नोंद झाली आहे. पुढच्या टप्प्यात जिल्ह्यातील न.प. क्षेत्रात ही जनता संचारबंदी केली जाणार आहे. कोरोना राज्यात दाखल झाल्यानंतर दीर्घकाळपर्यंत गडचिरोली जिल्हा कोरोनामुक्त होता. मात्र, नंतर ही संख्या सातत्याने वाढत असल्याने जनता संचारबंदीचा उपचार  केला जात आहे.

दरम्यान, गडचिरोलीच्या शेजारी असलेल्या चंद्रपूरात कोरोनाचा कहर सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यात 24 तासांत 210 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर दोघांचा मृत्यू झाला आहे. चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 8499 आहे. त्यापैकी 4901 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहेत. तर 3474 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनामुळे 124 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

दिलासादायक बातमी! 24 तासांत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त

भारतात कोरोनाचा (Covid-19 Infected) धोका काही कमी होण्याचं नाव घेत नाहीये. देशात रोज कोरोनाचे धक्कादायक आकडे समोर येत आहेत. मागील 24 तासांमध्ये 83 हजार 347 नवी प्रकरणं समोर आली आहे तर 1085 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या कालच्या आकडेवारीमुळे देशात कोरोना रुग्णांची एकूण संख्या 56 लाख 46 हजार 11 वर पोहोचली आहे. मृतांचा आकडाही 90,020 वर पोहोचला आहे.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासामध्ये 87,007 लोकांनी कोरोनावर मात करत बरे झाले आहेत. यासोबत रुग्ण बरे होण्याची संख्या आता 45 लाख 87 हजार 614 पर्यंत पोहोचली आहे. तर देशात सध्या कोरोनाची 9 लाख 68 हजार 377 अॅक्टिव्ह प्रकरण आहेत.

देशात 12 राज्ये अशी आहेत जिथे बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण 81% पेक्षा जास्त आहे. त्यापैकी अंदमान-निकोबार, दादरा-नगर हवेली आणि बिहारमधील बरे होण्याचा दर 90 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. आतापर्यंत देशात 43.95 लाख रुग्ण बरे झाले आहेत आणि कोरोनाव्हायरस रिकव्हरी दर 80.12% पर्यंत पोहोचला आहे.

हेही वाचा...39 वर्षांनी मुंबईत इतिहासाची पुनरावृत्ती; 23 सप्टेंबरच्या पावसाचं हे आहे कनेक्शन

देशातील 7 राज्यांमध्ये कोरोनाची अधिक प्रकरणं समोर येत आहेत. यामध्ये महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, पंजाब आणि दिल्लीचा समावेश आहे. दरम्यान, पुढील 3 महिने संसर्गाचा अधिक धोकादायक आहे. म्हणून कोरोनाचे नियम पाळणे आणि विशेष काळजी घेणं महत्त्वाचं आहे.

First published:

Tags: Corona, Corona vaccine, Corona virus in india, Coronavirus, Coronavirus symptoms, Gadchiroli