मुंबई, 23 मे : महाराष्ट्रात (Maharashtra Corona) कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये होणारी घट रविवारीदेखिल पाहायला मिळाली. रविवारी राज्यात कोरोनाचे नवे 26 हजार 672 रुग्ण (Maharashtra Corona Case updates)आढळून आले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमधील (Corona Second wave) रुग्णसंख्येचा विचार करता गेल्या दोन महिन्यांमधला हा सर्वात कमी आकडा आहे. पण कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली असली तरी 594 रुग्णांचा रविवारी कोरोनामुळं मृत्यूदेखिल झाला आहे.
(वाचा-Video : पोलिसांनी बाईकचा हेडलाईट फोडला, मग संतप्त पत्नीने पोलिसांनाच घाम फोडला)
महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीचा विचार करता सध्या राज्यामध्ये कोरोनाच्या एकूण अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 3 लाख 48 हजार 395 एवढी आहे. तर राज्यात आतापर्यंतच्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही 55 लाख 53 हजार 225 वर गेली आहे. तर आतापर्यंतच्या मृतांचा आकडा हा तब्बल 87 हजार 300 एवढा झाला आहे. गेल्या 24 तासांमध्ये कोरोनावर मात केलेल्या रुग्णांचा आकडा 29,177 झाला आहे. त्यामुलं राज्यात आतापर्यंत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांचा आकडा 51 लाख 40 हजार 272 झाला आहे.
(वाचा-Good News : भारतात तयार होतेय अधिक प्रभावी Corona Vaccine, 8 पट अधिक अँटिबॉडीज)
राज्यात रविवारी कोरोनामुळं मृत्यू झालेल्यांचा आकडा हा 594 एवढा आहे. त्यामुळं मृत्यूदर ही काहिशी चिंतेची बाब समजली जात आहे. सध्या कोरोनाच्या रुग्णांचा राज्यातील मृत्यूदर हा 1.59% एवढा आहे. पुणे आणि मुंबईतील आकडे दिलासा देत असले तरी अहमदनगरमध्ये रविवारी कोरोनामुळं झालेल्या मृत्यूचा आकडा 39 होता. त्यामुळं प्रशासनासमोर ही चिंतेची बाब बनली आहे. तर कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट हा घटला आहे. राज्यातील सद्याचा कोरोनाचे रुग्ण सापडण्याचा पॉझिटिव्हिटी रेट 16.9% एवढा आहे.
निर्बंधांचे कठोरणे पालन करा
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या घटत असली तरी गाफील राहता कामा नये. त्यामुळं कोविडच्या सर्व सूचना, नियम आणि दिशानिर्देशांचे पालन करायला हवे. लॉकडाऊन हटवण्यासंर्भात नंतर निर्णय घेऊ पण सध्या कोणताही निष्काळजीपणा होता कामा नये असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. सध्यातरी राज्यात लॉकडाऊन वाढवण्याचे संकेतच त्यांनी दिले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.