जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / नाशिक / काडीपेटी पेटवताच गॅसचा सिलिंडरचा स्फोट, नाशिक हादरलं; 6 कामगार जखमी

काडीपेटी पेटवताच गॅसचा सिलिंडरचा स्फोट, नाशिक हादरलं; 6 कामगार जखमी

काडीपेटी पेटवताच गॅसचा सिलिंडरचा स्फोट, नाशिक हादरलं; 6 कामगार जखमी

नाशिक (Nashik district) जिल्हा गॅस सिलिंडरच्या (gas cylinder Blast) स्फोटानं हादरलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नाशिक, 23 ऑक्टोबर: नाशिक (Nashik district) जिल्हा गॅस सिलिंडरच्या (gas cylinder Blast) स्फोटानं हादरलं आहे. या स्फोटात 6 कामगार जखमी झालेत. ही घटना नाशिक जिल्ह्यातल्या कुमावतनगरमध्ये घडली आहे. स्वयंपाक करण्यासाठी गॅस सुरु करताना काडीपेटी पेटवल्यावर गॅसचा भीषण स्फोट झाला. या स्फोटात 6 कामगार भाजले आहेत. यातील दोन कामगार 90 टक्के भाजले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हेही वाचा-   Google वर सर्च करून पोटच्या मुलीला दिला भयंकर मृत्यू; आईचं राक्षसी कृत्य वाचून हादराल समोर आलेल्या माहितीनुसार, सहा कामगार कुमावतनगरमध्ये एकत्रित राहत होते. हे सर्व कामगार परराज्यातले असून टाइल्स बसवण्याचं काम करतात. शुक्रवारी सकाळी स्वयंपाक करण्यासाठी गॅस सुरु करत होते. त्यावेळी त्यांच्यातल्या एकानं काडीपेटीची काडी पेटवली. त्याचवेळी गॅस सिलिंडरचा भडका उडला आणि मोठा स्फोट झाला. हा स्फोट होताच संपूर्ण परिसर हादरून गेला. या स्फोटात लवलेश धरम पाल (रा. अदालतपूर, उत्तर प्रदेश), अखिलेख धरमपाल, विजयपाल फत्तेपूर, संजय मौर्य, अरविंद पाल, वीरेंद्रकुमार (सर्व रा. फतेहपूर, उत्तर प्रदेश) हे गंभीर जखमी झाले आहेत. यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर त्यातले दोघे कामगार 90 टक्के भाजलेत. या स्फोटाप्रकरणी नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेही वाचा-   अनन्या पांडेच्या कबुलीनं आर्यन खानचा पाय आणखी खोलात गॅस गळतीमुळे जिल्ह्यात 6 महिन्यात 13 मृत्यू जिल्ह्यात गेल्या 6 महिन्यात गॅस गळतीमुळे आतापर्यंत 13 जणांचा बळी गेला आहे. या वर्षी एप्रिल महिन्यात सारडा सर्कलमधील संजरीनगर सोसायटीत गॅस सिलिंडर बदल असताना गॅस गळती झाली. या स्फोटात सात जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील भारतनगर झोपडपट्टीमध्ये सिलिंडरचा स्फोट झाला होता. या स्फोटात पाच तरुणांचा मृत्यू झाला होता. तर 4 सप्टेंबरला एका हॉटेलमध्ये गॅस स्फोट झाला होता. या स्फोटात स्वयंपाकी रुपेश गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: gas , nashik
  • First Published :
जाहिरात
जाहिरात