मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पहिल्यांदाच झालेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वाधिक लोकप्रिय, 13 राज्यांच्या सर्वेक्षणातून माहिती समोर

पहिल्यांदाच झालेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वाधिक लोकप्रिय, 13 राज्यांच्या सर्वेक्षणातून माहिती समोर

Cm Uddhav Thackeray most popular: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कमाल केली आहे.

Cm Uddhav Thackeray most popular: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कमाल केली आहे.

Cm Uddhav Thackeray most popular: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कमाल केली आहे.

  • Published by:  Pooja Vichare
मुंबई, 15 जुलै: सध्या देशातील राज्यातले मुख्यमंत्री (Chief ministers )विविध कारणांनं चर्चेत आहेत. उत्तर प्रदेशसारख्या बड्या राज्यांपासून पंजाबसारख्या मध्यम आकाराच्या राज्य ते उत्तराखंडसारख्या छोट्या राज्यांपर्यंत सर्वच मुख्यमंत्र्यांची जोरदार चर्चा सुरु आहे. अशातच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray)यांनी कमाल केली आहे. पहिल्यांदाच मुख्यमंत्री झालेले उद्धव ठाकरेंनी लोकप्रिय (The most popular) मुख्यमंत्र्यांच्या यादीत नाव पटकावलं आहे. प्रेश्नम (Prashnam )नं भारतातील विविध राज्यांसाठी मुख्यमंत्री त्रैमासिक मान्यता रेटिंग (approval ratings)सुरू केली आहे. पहिल्या फेरीत त्यांनी 13 राज्यांची निवड केली. या राज्यांमध्ये भारतातील 67 टक्के लोकसंख्या आहे. यात बिहार, गोवा, गुजरात, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांचा समावेश आहे. सर्वात लोकप्रिय सर्वेक्षणानुसार असं समोर आलं की, महाराष्ट्राचे (Maharashtra)मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray )यांना सर्वाधिक पसंती मिळाली आहे. सर्वेक्षणात जवळपास 49 टक्के(49 per cent) मतदारांनी (voters) उद्धव ठाकरेंची कामगिरी चांगली असल्याचं मत व्यक्त केलं आहे. त्यामुळे आम्ही पुन्हा उद्धव ठाकरेंना मतदान करणार असल्याचं काही मतदारांनी सांगितलं. या यादीत उद्धव ठाकरे अव्वल आहेत. त्यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान (Madhya Pradesh CM Shivraj Singh Chouhan) यांना 44 टक्के पसंती मिळाली आहे. तिसऱ्या क्रमांकावर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत (Rajasthan CM Ashok Gehlot ) आहेत. राज्यातील सर्वेक्षण झालेल्या 40 टक्के मतदारांनी त्यांच्या कामगिरीला मान्यता दिली. हेही वाचा-  VIDEO: मनसेला बिग बींच्या उत्तराची 'प्रतिक्षा'; घराबाहेर बॅनर लावत केली मोठं मन दाखवण्याची मागणी या 13 राज्यांमधील जवळपास 17,500 मतदारांचं सर्वेक्षण करुन हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. तुम्हाला तुमच्या मुख्यमंत्र्यांचं काम कसं वाटतं? त्यांच्या कामाची पद्धत वाढवते का? असा प्रकाराचे प्रश्न विचारण्यात आले होते. या प्रश्नांपुढे 4 ऑप्शन देण्यात आले होते. त्यानुसार मतदारांना त्याची निवड करायची होती.
First published:

Tags: Cm, Uddhav thackarey

पुढील बातम्या