• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • MPSC परीक्षेच्या उमेदवारांना शनिवारी लोकलने प्रवास करण्यास परवानगी; मात्र...

MPSC परीक्षेच्या उमेदवारांना शनिवारी लोकलने प्रवास करण्यास परवानगी; मात्र...

राज्यात तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता अद्यापही सर्वांना सरसकट लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आलेली नाही.

 • Share this:
  मुंबई, 2 सप्टेंबर : राज्यात तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता अद्यापही सर्वांना सरसकट लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आलेली नाही. लोकल (Mumbai Local) प्रवासासाठी दोन्ही लशीचे डोस आणि त्यानंतर 14 दिवसांचं अंतर असणं गरजेचं आहे. शनिवारी राज्यभरात MPSC च्या परीक्षांचं आयोजन करण्यात आलं आहे. उमेदवारांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी अडथळा येऊ नये यासाठी त्या दिवशी एमपीएससीच्या उमेदवारांना लोकलने प्रवास करण्यास परवानगी देण्यात यावी अशी भूमिका केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी घेतली असल्याची माहिती भाजप नेते आशिष शेलार यांनी दिली आहे. मात्र असे असले तरी उमेदवारांना त्यांचं हॉल तिकीट दाखवून लोकलचं तिकीट काढता येणार आहे. भाजप नेते आशिष शेलार यांच्याकडे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी रेल्वे प्रवास करण्यासाठी परवानगी देण्यात यावी अशी मागणी केली होती. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब साठी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. हे ही वाचा-Maharashtra Schools Reopen: पुढील दोन दिवसांत शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घेणार त्यांनी सोशल मीडियावरही याबाबत ट्वीट केलं होतं. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आशिष शेलार यांच्या मागणीवर सकारात्मक भूमिका घेऊन विद्यार्थ्यांना हॉल तिकिट पाहून रेल्वेचे तिकिट दिले जाईल अशी भूमिका घेतली आहे. यामुळे केंद्राच्या निर्णयावर राज्य सरकारने तात्काळ निर्णय घ्यावा आणि विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी आशिष शेलार यांनी राज्य सरकारकडे केली आहे. आशिष शेलार ट्विट ॲान रेल्वे प्रवास ४ सप्टेंबर रोजी एमपीएससी परीक्षा आहे. यासंदर्भात मुंबई उपनगरातील विद्यार्थ्यांनी माझ्याकडे रेल्वे प्रवास करण्याकरता तिकिट मिळावे हि विनंती केली. या विनंती संदर्भात मी रेल्वे राज्यम्त्री रावसाहेब दानवे यांच्याशी संवाद साधला. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून राज्य सरकारच्या प्रस्ताव येणे गरजेच असल्याच म्हटलं आहे. या संदर्भात मुख्य सचिव सिताराम कुंटे यांना हा विषय लक्षात आणून दिला.
  Published by:Meenal Gangurde
  First published: