ठाकरे सरकारला विदर्भ, मराठवाड्याचा विसर; अर्थसंकल्पानंतर फडणवीसांनी डागली तोफ

ठाकरे सरकारला विदर्भ, मराठवाड्याचा विसर; अर्थसंकल्पानंतर फडणवीसांनी डागली तोफ

अजित पवारांनी सादर केलेला अर्थसंकल्प हे केवळ भाषण अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

  • Share this:

मुंबई, 06 मार्च : ठाकरे सरकारमधील पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला आहे. या अर्थसंकल्पानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कडाडून टीका केली आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी हा अर्थसंकल्प मांडला नाही तर निव्वळ भाषण केलं आहे. ठाकरे सरकारला सत्तेचं दिलेलं वचन लक्षात आहे पण शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन जे आश्वासन दिलं आहे त्याचा मात्र विसर पडल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. आम्ही राबवलेल्या योजना आणि सुविधाच वेगळ्या नावानं त्यांनी पुन्हा आणल्या आहेत. शेतकऱ्यांच्या तोंडाला अक्षरश: ठाकरे सरकारनं पानं पुसली आहेत. ज्या घोषणा करण्यात आल्या त्या केंद्र सरकारच्या भरवशावर आणि त्यांनी राबवलेल्याच आहेत. त्या स्वत:च्य़ा नावे खपवण्यात आल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

ठाकरे सरकारनं हा अर्थसंकल्प पूर्ण असल्याचा दावा केला असला तरीही विरोधी पक्ष मात्र हा दावा मान्य करण्यास तयार नाही.

हे वाचा-स्वस्त घरं, स्थानिकांना नोकऱ्या आणि महिलांना संरक्षण असं आहे ठाकरे सरकारचं बजेट

काय म्हणाले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस?

1. 'कोकणच्या विकासाच्या नावाखाली तोंडाला पान पुसली आहेत. तर या अर्थसंकल्पात विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचा सरकारला विसर पडला आहे.'

2.'शेतकऱ्यांसाठी कोणताही अतिरिक्त निधी किंवा सुविधा या सरकारकडून देण्यात आल्या नाहीत. ज्या योजना केंद्र सरकारने आणि जो निधी सरकारकडून आला आहे. तोच निधी शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.'

3.'केंद्र सरकारवर टीका करूनच या सरकारनं नकारात्मक सुरवात केली आहे.'

4.'तरुणांना नवीन रोजगार देण्यात येणार होता. मात्र इथे तर विद्यावेतन देण्यात येणार आहे. विद्यावेतन देण्यासंदर्भातील नियम हा केंद्र सरकारनं लागू केला होता. त्यानुसार आमच्याच सरकारपासून हा लागू झाला आहे. रोजगाराचं काय? हे तर अप्ट्रॅन्टीससाठी विद्यावेतन देणार आहेत.'

5. 'महिला सक्षमीकरणासाठी राज्य सरकारनं कोणत्याही नवीन योजना आणल्या नाहीत. ज्या आम्ही सुरू केल्या होत्या त्याच योजना हे सरकार पुन्हा नव्यानं राबवत आहे.'

हे वाचा-Maharashtra Budget : सर्वसामन्यांना मोठा झटका, बजेटनंतर पेट्रोल-डिजेल महागणार

First published: March 6, 2020, 1:44 PM IST

ताज्या बातम्या