मुंबई : महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला असला तरी या सोहळ्याला गालबोट लागलं आहे. या सोहळ्यात उपस्थित असलेल्या आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या अनुयायांना उष्माघात झाला. या कार्यक्रमात उष्माघातामुळे ११ जणांचा मृत्यू झाला आहे. यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला ते म्हणाले की, उष्माघातामुळे अनुयायांचा झालेला मृत्यू वेदनादायी आहे. मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत देणार असल्याचं सांगितलं. खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित काही अनुयायांचा उष्माघातामुळे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे लागले. दुर्दैवाने त्यातील अकरा जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. मी या श्री सदस्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ही अतिशय वेदनादायी आणि दुर्दैवी घटना आहे.
महाराष्ट्र भूषण पुरस्काराला गालबोट, आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या अनुयायांना उष्माघातराज्य शासनातर्फे मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येणार असून रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या श्री सदस्यांचा उपचाराचा खर्च शासनामार्फत केला जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. याशिवाय उपचाराचा खर्च शासनामार्फत करणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे.
आप्पा साहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषणने सन्मानित करण्यासाठी खारघर येथील सेंट्रल पार्क येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळातील सर्व सदस्य सहभागी झाले होते.
Heat stroke death in Maharashtra : एकाच वेळी उष्माघाताचे 8 बळी; अशी माहिती जी तुमचा जीव वाचवेलउष्माघातामुळे अनेक जण चक्कर येऊन खाली पडले आहेत, तर अनेक जणांना उलटीही झाली आहे. खारघरमधील टाटा रुग्णालय, पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालय तसंच मेडी कव्हर रुग्णालय आणि एमजीएम रुग्णालयामध्ये रुग्णांना दाखल करण्यात आलं आहे.

)







