उष्माघात हा उकाड्याशी संबंधित आजार आहे. ज्यामध्ये शरीराचे तापमान असामान्यपणे वाढते. लगेच उपचार न केल्यास तो जीवघेणा ठरू शकतो.
शरीराच्या उच्च तापमानाच्या कालावधीनुसार, वेळेत उपचार न केल्यास ते मेंदू किंवा किडनीसारख्यामहत्त्वपूर्ण अवयवांना कायमचे नुकसान पोहोचवू शकतं.
अशक्तपणा, डोकेदुखी, चक्कर येणं आणि मळमळ ही सामान्य लक्षणं आहेत. उष्माघात सुरू होण्यापूर्वी घाम येणं थांबतं, परंतु, हे नेहमीच होईल, असं नसतं.
उन्हाळ्यात शरीराला जास्त घाम येतो. पाण्याच्या कमतरतेमुळे डिहायड्रेशनचा होऊ शकतं. डिहायड्रेशनमुळे आपल्याला चक्कर येणं, थकवा येणं, डोकेदुखी यासारख्या समस्या होऊ शकतात.
उन्हाळ्यात द्रवपदार्थांचं सेवन वाढवा. नारळ पाणी, लिंबूपाणी, ताक, लस्सी, रस यांचं सेवन करा. ही सर्व पेयं शरीरात पाण्याची कमतरता होऊ देणार नाहीत आणि तुम्हाला भरपूर ऊर्जा मिळेल.