मुंबई, 24 ऑक्टोबर : विधानसभा निवडणूक निकालाचं चित्र आता हळूहळू स्पष्ट होतंय. भाजप आणि शिवसेनेच्या मिळून महायुतीच्या जागांचा विचार केला तर महायुतीला 166 जागा मिळतील, असं चित्र आहे. भाजप सध्या 102 जागांवर आघाडीवर आहे तर शिवसेना 62 जागांवर आघाडीवर आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 122 जागा मिळाल्या होत्या. आता मात्र त्यापेक्षा 21 जागा कमी मिळतील, असा अंदाज आहे. याउलट शिवसेनेला मागच्या वेळी 63 जागा मिळाल्या होत्या. यावेळी सेनेची फक्त 1 जागा कमी होतेय. भाजप - शिवसेना महायुतीचं सरकार येणार असलं तरी भाजपचं नुकसान आणि शिवसेनेचा फायदा हा मुद्दा सगळ्यांसाठी महत्त्वाचा आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीला 93 जागा मिळतील, असं चित्र आहे. यामध्ये 2014 च्या तुलनेत राष्ट्रवादीला फायदा झाला पण काँग्रेसचं मात्र नुकसान झालं, असं दिसतं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला मागच्या वेळी 41 जागा मिळाल्या होत्या. त्यांच्या जागांमध्ये 11 ची वाढ होऊन त्या 52 वर गेल्या आहेत. काँग्रेसला मागच्या वेळी 42 जागा होत्या. आता मात्र त्यांच्या 8 जागा कमी झाल्या आहेत. =====================================================================
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







