जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Beed Crime: एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीला गावगुंडाने पाजले विष; बीडमधील धक्कादायक घटना

Beed Crime: एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीला गावगुंडाने पाजले विष; बीडमधील धक्कादायक घटना

Representative Image

Representative Image

Crime News: “माझ्यासोबत लग्न कर” म्हणत 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला गावगुंड तरुणाने विष पाजल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

बीड, 1 जून : एकतर्फी प्रेमातून (one-sided love affair) एका अल्पवयीन मुलीला जबरदस्ती विष पाजल्याची (forcefully feed poison to minor girl) धक्कादायक घटना बीडमध्ये (Beed) घडली आहे. “माझ्यासोबत लग्न कर” म्हणत ऊसतोड कामगाराच्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला, गावातीलच नराधम गावगुंडाने विष पाजलं. यावेळी कुटुंबातील व्यक्तींनी वेळीच सतर्कता दाखवत, त्या गावगुंडाच्या तावडीतून मुलीला सोडवत, तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. सध्या पीडितेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही धक्कादायक आणि संतापजनक घटना, बीडच्या गेवराई तालुक्यातील काजळवाडीमध्ये रात्री आठच्या दरम्यान घडली आहे. दोन वर्षांपासून छेडछाड अन् लग्नासाठी धमक्या  नुकतीच इयत्ता दहावीची परीक्षा देणारी 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी, आपले आई-वडील ऊस तोडणीसाठी कारखान्याला गेल्यानंतर, चुलत्याकडे राहत होती. हीच संधी साधून गावातील गाव गुंड असणारा एक 25 वर्षीय तरुण तिची छेड काढत असे. “गेल्या दोन वर्षांपासून तो सतत तो छेड काढतोय, माझ्यासोबत लग्न कर, असं म्हणत सतत धमक्या देतोय”. आरोपी थेट घरात शिरला आणि… शाळेत जाताना तिचा रस्ता अडवत होता, मात्र काल त्याने हद्दच पार केली. शेतातच राहणाऱ्या पीडितेच्या घरी तो गेला, ‘माझ्यासोबत लग्न कर असं म्हणत त्याने थेट विष पाजलं’. यादरम्यान कुटुंबातील व्यक्तींनी वेळीच सतर्कता दाखवली आणि त्या गुंडांच्या तावडीतून आपल्या मुलीला सोडवलं. त्यानंतर जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केलं आहे. सध्या तिच्यावर जिल्हा रुग्णालयातील आयसीयू वार्डात उपचार सुरू आहेत. दरम्यान तलवाडा पोलीसांकडून पीडितेचा जबाब नोंदवण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू आहे. वाचा :  पत्नीसोबत 63 वर्षीय वृद्धाला आक्षेपार्ह अवस्थेत पाहून संतापला पती,धक्कादायक शेवट लग्नासाठी जबरदस्ती तर या विषयी पीडित अल्पवयीन मुलगी म्हणाली, की तो सतत शाळेत जाता-येताना मला त्रास देत होता. माझ्यासोबत लग्न कर म्हणून धमकी टाकत होता, रस्त्यात अडवत होता. पीडितेच्या वडिलांनी म्हटलं, की मी ऊसतोड कामगार आहे. माझ्या मुलीला गावातील तुकाराम सतत छेडत होता. माझ्यासोबत लग्न कर म्हणून धमकी देत होता. मी उसतोडायला गेल्या नंतर त्याने मुलीला खूप त्रास दिला. पीडितेच्या चुलत्यांनी सांगितले, गेल्या दोन वर्षांपासून तो त्रास देतोय. मात्र गावातील असल्यामुळे आम्ही त्याला समजावून सांगितलं, आम्हाला तो ऐकेल असं वाटलं, मात्र तो सतत मुलीला अडवून त्रास द्यायचा. माझा भाऊ ऊसतोड कामगार आहे. तो कारखान्याला गेल्यावर देखील त्याने अनेक वेळा तिची छेड काढली. काल त्याने घरी जाऊन विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आता आम्हाला मुलगी हुशार असून देखील तिला पुढील शिक्षण शिकून द्यावं की नाही ? असा प्रश्न आमच्यासमोर पडलाय. वाचा :  एकटं राहण्यापेक्षा लेकीच्या कुजलेल्या मृतदेहाशेजारी झोपली आई; 4 दिवसांनी दार… सामाजिक कार्यकर्ते पंडित तुपे म्हणाले, की ऊसतोड कामगारांच्या मुलीला छेडण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच घटना नाही, या अगोदरही अनेक घटना बीड जिल्ह्यात घडल्या आहेत. रोडरोमिओंचा त्रासाला कंटाळून मुलींनी आत्महत्या केल्या आहेत. दिवसेंदिवस बीड जिल्ह्यात महिला आणि मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या प्रमाणात वाढ झाली आहे. या मुलीला देखील गावातील ब्लास्टिंग काम करणाऱ्या गावगुंड तरुणाकडून त्रास होता. त्याने मुलीला विष पाजून मारण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे अशा नराधम तरुणांवर कडक करून कारवाई करण्यात यावी. अशी मागणी पंडित तुपे यांनी केली आहे. बीड जिल्ह्यात महिला आणि मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेवराई तालुक्यातील दिमाखवाडी, त्याचबरोबर गेवराई शहरात देखील रोडरोमिओंचा त्रासाला कंटाळून मुलींनी आत्महत्या केली आहे. तर काही दिवसांपूर्वीच अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव येथील अल्पवयीन मुलीने गावातील रोडरोमिओंचा त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. या सर्व घटना ताज्या असतानाच पुन्हा एकदा गेवराई तालुक्यातील काजळवाडीमध्ये हा प्रकार उघड झाल्याने, जिल्ह्यात महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. त्यामुळे अशा रोडरोमिओंवर कडक कारवाई करावी. अशी मागणी संतप्त बीडकरांमधून होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात