जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / एकटं राहण्यापेक्षा लेकीच्या कुजलेल्या मृतदेहाशेजारी झोपली आई; 4 दिवसांनी शेजारच्यांनी दार उघडताच भयंकर दृश्य

एकटं राहण्यापेक्षा लेकीच्या कुजलेल्या मृतदेहाशेजारी झोपली आई; 4 दिवसांनी शेजारच्यांनी दार उघडताच भयंकर दृश्य

एकटं राहण्यापेक्षा लेकीच्या कुजलेल्या मृतदेहाशेजारी झोपली आई; 4 दिवसांनी शेजारच्यांनी दार उघडताच भयंकर दृश्य

घरातून दुर्गंधी पसरल्यानंतर 4 दिवसांनी स्थानिकांनी दार उघडलं…

  • -MIN READ
  • Last Updated :

बंगळुरू, 31 मे : कर्नाटकातील (Karnatak News) मांड्या जिल्ह्यातून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. येथे लेकीच्या मृत्यूनंतर तिच्या आईने तिच्यावर अंत्यसंस्कार केलं नाही, आणि तिच्या मृत्यूबाबत कोणालाही कळवलं नाही. तब्बल 4 दिवसांपर्यंत ती आपल्या लेकीच्या मृतदेहासोबत खोलीत वावरत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हलाहल्ली गावात राहणारी वृद्ध महिला नागम्मा आपल्या मुलीसोबत राहत होती. खूप दुर्गंधी आल्यानंतरही तिने घराचं दार उघडलं नाही तर शेजारच्यांनी दार तोडलं. यानंतर लोकांनी जे काही पाहिलं ते हैराण करणारं होतं. महिला आपल्या लेकीच्या कुजलेल्या मृतदेहाशेजारी झोपली होती. रूपाचा मृत्यू झाला, परंतू कोणालाच नाही कळवलं… नागम्माची मुलगी रूपा हिचा घरातच मृत्यू झाला. मात्र नागम्माने कोणालाच याबाबत सांगितलं नाही. तिने लेकीच्या मृतदेहासोबत राहण्याचा निर्णय घेतला. तिने घराची दार बंद केली. आणि लेकीच्या मृतदेहा शेजारीच झोपत होती. परिसरात दुर्गंधी पसरल्यानंतर झाला खुलासा… स्थानिकांना सुरुवातील महिलेच्या घरातून येणाऱ्या दुर्गंधीकडे दुर्लक्ष केलं. सुरुवातील उंदीर मेल्यामुळे ही दुर्गंधी येत असल्याचा संशय व्यक्त केला. मात्र कालांतराने रूपा आणि तिची आई नागम्मा घराबाहेर न दिसल्याने संशय व्यक्त केला. त्यांनी रूपाला फोनवरुन संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या कॉलचं काहीच उत्तर आलं नाही. पोलिसांनी सांगितलं की, रूपाच्या मृत्यूचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. 10 वर्षांच्या लग्नानंतर रूपा पतीकडून वेगळी होऊन आपल्या आईकडे राहत होती. तेव्हापासून दोघी एकत्रच राहत होत्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात