मुंबई, 16 जुलै: आज दुपारी एक वाजता दहावीचा (SSC Result) ऑनलाईन निकाल जाहीर होणार आहे. गुरुवारी शालेय शिक्षणमंत्री डॉ. वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी यासंदर्भातली माहिती दिली. ही माहिती देताना त्यांनी आपल्या ट्विटर (Twitter) अकाऊंटवर सविस्तर माहिती दिली आहे. (Maharashtra SSC result 2021)
एकूण आठ माध्यमानुसार 2020-21 वर्षातील एसएससी (इ. 10 वी ) परीक्षेला एकूण 16 लाख 58 हजार 624 विद्यार्थी बसल्याची नोंद झालेली आहे. यापैकी 9 लाख 09 हजार 931 मुलं असून मुलींची संख्या 7 लाख 48 हजार 693 एवढी आहे. या विद्यार्थ्यांचा दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. लेखी परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. मात्र करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ती रद्द करण्यात आली.
या निकालात पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर,कोकण या 9 विभागीय शिक्षण मंडळांमार्फत 2021 मध्ये इयत्ता 10 वी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण जाहीर केले जातील.
हेही वाचा- 40 लाख जणांचे जीव घेतलेला कोरोना आता आणखीच घातक होणार; WHO नं केलेलं वर्णन चिंताजनक
असा तपासा तुमचा निकाल (Check How To Know Your Score)
अधिकृत महाराष्ट्र निकाल वेबसाइटला भेट द्या. maharashtraeducation.com, http://result.mh-ssc.ac.in, http://mahahsscboard.in
मुख्यपृष्ठावरील महाराष्ट्र इयत्ता 10 च्या निकालाच्या 2021 च्या (SSC BOARD RESULT) लिंकवर क्लिक करा.
आपणास एका नवीन पृष्ठावर पुनर्निर्देशित केले जाईल.
आपली क्रेडेन्शियल्स टाइप करा आणि लॉग इन करा.
आपला एसएससी निकाल आपल्या स्क्रीनवर दिसून येईल.
संदर्भासाठी निकालाचे प्रिंटआउट डाउनलोड करा.
असं होणार मूल्यांकन
यावर्षी राज्य शिक्षण विभागाने निकालाच्या गणितासाठी पर्यायी मूल्यांकन निकष लावले आहेत. महाराष्ट्र वर्ग दहावीच्या मूल्यांकन निकषानुसार, वर्ग 9 ची वार्षिक परीक्षा आणि दहावीच्या अंतर्गत मूल्यांकन, युनिट टेस्ट आणि प्री-बोर्ड मधील विद्यार्थ्यांच्या कामगिरीच्या आधारे निकाल मोजला जाईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Exam result, Ssc board