• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • Maharashtra 10th result 2021 Declared: न झालेल्या 10 वीच्या परीक्षेचा निकाल अखेर जाहीर

Maharashtra 10th result 2021 Declared: न झालेल्या 10 वीच्या परीक्षेचा निकाल अखेर जाहीर

Maharashtra 10th result 2021 announced: दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल तयार करुन हाच निकाल आज ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे.

  • Share this:
    मुंबई, 16 जुलै: दहावीचा निकाल जाहीर (Maharashtra 10th result) झाला आहे. कोरोनाच्या (Corona Virus) दुसऱ्या लाटेच्या (Second Wave) प्रादुर्भावामुळे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षा (Maharashtra 10th result) होऊ शकल्या नाहीत. तरी विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल तयार करुन हाच निकाल आज ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे. (SSC result 2021 Maharashtra Board) शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील निकालासंदर्भातली माहिती दिली आहे. यंदाची  निकालाची टक्केवारी  99.95  टक्के आहे. कोकण विभागाचा सर्वाधिक 100 टक्के निकाल लागला असून सर्वात कमी निकाल नागपूर जिल्ह्याचा लागला आहे. नागपूर विभागाचा 99.55 टक्के आहे. पुनर्परीक्षार्थी निकालाची टक्केवारी 90.85 इतकी आहे. 957 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत. निकालात पुन्हा मुलींनी बाजी मारली आहे. विद्यार्थिनी पुन्हा अव्वल असून मुलींच्या निकालाची टक्केवारी  99.96% इतकी आहे. मुलांची टक्केवारी 99.94% असून राज्यातील 22 हजार 384 शाळांचा निकाल 100 % लागला आहे. 6922 विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवले असून 9 शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आहे. 27 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल 97.84 टक्के लागला आहे. परीक्षा निकालाची प्रक्रिया सगळीच नवीन असून तरीही वेळेत काम पूर्ण झालंय, सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेतली असल्याची प्रतिक्रिया दिनकर पाटील दिली आहे. तसंच श्रेणी सुधारण्यासाठी विद्यार्थ्यांना संधी मिळणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं. हेही वाचा- VIDEO: भारतीय सैन्याचं यश, लष्कर ए तोयबाच्या आणखी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान असा तपासा 10 वीचा निकाल निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर http: //result.mh-ssc.ac.in आणि mahahssc board.in जा SSC BOARD RESULT या पर्यायावर क्लिक करा. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचा सीट नंबर टाइप करा. सीट नंबर स्पेसशिवाय टाइप करा. आईच्या नावाची पहिली तीन अक्षर टाका. लगेचच तुम्हाला तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल. तुम्हाला तो निकाल डाऊनलोड करता येणार आहे. विद्यार्थी संदर्भासाठी निकालाचे प्रिंटआउटही काढू शकणार आहेत. हेही वाचा- पुणेकरांना या आठवड्यातही सवलत नाहीच, निर्बंध 'जैसे थे'च कोकण विभागाचा सर्वाधिक 100 टक्के निकाल लागला तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी 99.84 टक्के लागला आहे. विभागानुसार दहावीच्या निकालाची टक्केवारी कोकण विभागाचा निकाल 100 पुणे विभागाचा निकाल 99.96 टक्के नागपूर विभागाचा निकाल 99.84 टक्के औरंगाबाद विभागाचा निकाल 99.96 टक्के मुंबई विभागाचा निकाल 99.96 टक्के कोल्हापूर विभागाचा निकाल 99.92 टक्के अमरावती विभागाचा निकाल 99.98 टक्के नाशिक विभागाचा निकाल 99.96 टक्के लातूर विभागाचा निकाल 99.96 टक्के नागपूर विभागाचा निकाल 99.84 यंदाही दहावीच्या निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींच्या निकालाची टक्केवारी 99.96 टक्के आहे. तर मुलांच्या निकालाची टक्केवारी 99.94 टक्के इतकी आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल 97.84 टक्के लागला आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published: