जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / पुन्हा एकदा मुंबईची तुंबई; तिन्ही मार्गावरची लोकल सेवा कोलमडली, रेल्वे ट्रॅक पाण्याखाली

पुन्हा एकदा मुंबईची तुंबई; तिन्ही मार्गावरची लोकल सेवा कोलमडली, रेल्वे ट्रॅक पाण्याखाली

पुन्हा एकदा मुंबईची तुंबई; तिन्ही मार्गावरची लोकल सेवा कोलमडली, रेल्वे ट्रॅक पाण्याखाली

Mumbai Rain: मुंबई (Mumbai Rain) शहरासह उपनगरात जोरदार (heavy rains)पाऊस सुरु आहे. रात्रीपासून पावसाचं धुमशान पाहायला मिळतंय. जाणून घ्या अपडेट्स.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 16 जुलै: गुरुवार रात्रीपासून मुंबई (Mumbai Rain) शहरासह उपनगरात जोरदार (heavy rains) पाऊस सुरु आहे. रात्रीपासून पावसाचं धुमशान पाहायला मिळतंय. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. याचा परिणाम रस्ते वाहतुकी बरोबरच रेल्वे वाहतुकीवरही झाला आहे. मध्य तसेच हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. (Mumbai receives heavy rainfall from morning)

जाहिरात

पावसामुळे लोकलची वाहतूक कोलमडली आहे. मध्य रेल्वेची धीम्या मार्गावरील वाहतूक उशिरानं सुरु आहे. मध्य रेल्वेची वाहतूक स्लोवरून फास्टवर वळवण्यात आली आहे. कुर्ला- विद्याविहारची (Kurla -Vidyavihar) वाहतूक 20 ते 25 मिनिट उशिराने हार्बर रेल्वे 20 ते 25 मिनिट उशिरानं सुरु असल्याची माहिती रेल्वेचे मुख्य जनसंपर्क शिवाजी सुतार यांनी दिली आहे. ( Harbor line is also running 20-25 mins late)

दादर, सायन, माटुंगा परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे. गेल्या अनेक तासांपासून हा पाऊस सुरुच आहे.

जाहिरात

अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव परिसरात देखील मुसळधार पाऊस आहे. चुनाभट्टी, शीव रेल्वे स्थानकाच्या परिसरामध्ये सखल भागांमध्ये रात्रभर पाऊस पडल्याने पाणी साचलं आहे. (Mumbai Rain Live Update heavy Rain)

जाहिरात

मुंबईमध्ये गुरुवारी संध्याकाळनंतर पावसाने पुन्हा जोर धरला आणि रात्रभर अनेक भागांमध्ये पाऊस सुरु होता. त्यामुळेच सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. गांधी मार्केट परिसरामध्ये तर एक ते दीड फूटांपर्यंत पाणी साचलं आहे. वडाळ्यामध्येही काही ठिकाणी पाणी साचलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात