मुंबई, 30 जून : मान्सूनने (monsoon) दडी मारल्याने राज्यातील शेतकरी (farmer) आभाळाकडे पाहत बसला आहे. तर दुसरीकडे राज्याचे माजी कृषी मंत्री आमदार दादा भुसे (dada bhuse) मात्र बंडखोरी करत गोव्यात हॉटेलमध्ये बसले असल्याचा रोष शेतकरी व्यक्त करत आहेत. दादा भुसे यांनी बंडखोर केल्याने राज्यासह त्यांच्या मतदार संघातील शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दादा भुसे यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याने त्यांना 'महादगलबाज पुरस्कार' देण्यात येणार असल्याचे शेतकऱ्यांनी ठरवले असल्याचे सांगण्यात आले आहे.( dada bhuse shiv sena)
मान्सून राज्यातील काही भागात नसल्याने शेतकरी पेरणीच्या प्रतिक्षेत आहे तर अनेक जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे. या दरम्यान खतांच्या किमतीत भरमसाठ वाढ झाल्याने आर्थिक विवंचनेतही शेतकरी सापडला आहे. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना लुबाडण्यासाठी लिंकींगही देत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे कोण पाहणार हा मुद्दा उपस्थित केला जात आहे.
हे ही वाचा : फडणवीस-शिंदे मंत्रिमंडळात संजय राठोडांना लागणार लॉटरी, थेट...
शेतकऱ्यांची लुबाडणूक होत आहे आणि राज्यातील कृषी मंत्री चैनी करत असल्याचा राग शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. कृषी मंत्री असताना दादा भुसे यांनी बळीराजाचा द्रोह केल्याचेही शेतकरी म्हणाले. जसा स्वताच्या पक्षाशी द्रोह केला त्यापेक्ष्या अधिक बळीराज्याशी केला आहे. संकटकाळी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याची ही कृती दगलबाजी असल्याने कृषक समाज कार्यकर्त्यांनी या कृतीचा निषेध करीत कृषिमंत्री भुसे यांना“महादगलबाज” पुरस्कार दिला आहे. हा पुरस्कार जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आला असल्याची माहिती कृषक समाजाच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे.
कोणाला मिळणार मंत्रीपदे
एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार अखेर कोसळले आहे. आता भाजपकडून सरकार स्थापनेचा दावा केला जाणार आहे. पुढील दोन दिवसांमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. आता देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदें गटाचे सरकार येणार हे जवळपास निश्चित झाले आहे. मात्र या सरकारमध्ये मंत्री कोण होणार याची उत्सुकता आता सर्वांनाचा लागली आहे.
हे ही वाचा : opposition leader : अजित पवार की जयंत पाटील विरोधी बाकासाठी कोणाची लागणार वर्णी?
एकनाथ शिंदे यांनी जवळपास ३९ आमदारांना घेऊन बंड पुकारले होते पण फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे यांच्या गटाला १३ मंत्रिपदं मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील, उदय सामंत, दादा भुसे, अब्दुल सत्तार, संजय राठोड, शंभूराज देसाई, बच्चू कडू आणि तानाजी सावंत यांचा कॅबिनेट मंत्रीपद मिळणार असल्याची माहिती आहे. तर दीपक केसरकर, संदीपान भुमरे, संजय शिरसाट आणि भरत गोगावले यांना राज्यमंत्री मिळण्याची शक्यता आहे. या यादीबद्दल अद्याप भाजपकडून कोणतीही माहिती जाहीर करण्यात आली नाही. मात्र, मंत्रिमंडळाचा विस्तार हा अशाच पद्धतीने असण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Farmer, Monsoon, Shiv Sena (Political Party), Shiv Sena chief