Home /News /crime /

‘स्पेशल 26’ स्टाईलने दरोडा, बनावट ओळखपत्र दाखवून लुटले 2 लाख रुपये

‘स्पेशल 26’ स्टाईलने दरोडा, बनावट ओळखपत्र दाखवून लुटले 2 लाख रुपये

आपण सीबीआय अधिकारी (CBI Officer) असल्याचं सांगत एका डिस्टलरी कंपनीवर (Distillery Company) धाड टाकून पैसे लुटणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक (arrest) केली आहे.

    भोपाळ, 8 ऑगस्ट : आपण सीबीआय अधिकारी (CBI Officer) असल्याचं सांगत एका डिस्टलरी कंपनीवर (Distillery Company) धाड टाकून पैसे लुटणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक (arrest) केली आहे. सहा जणांच्या या टोळीनं एका बनावट ओळखपत्र (Bogus ID) आणि बंदुकीच्या (Gun) जोरावर दोन लाख रुपये लुटून नेल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. अशी घडली घटना मध्यप्रदेशातील छत्तरपूरमध्ये सीबीआय अधिकारी असल्याचं सांगत सहा जण एका डिस्टलरी कंपनीच्या कार्यालयात घुसले. अलिगढमध्ये बनावट दारू पुरवली जात असल्याच्या आरोपाची चौकशी करत असल्याचं या कंपनीचे मालक निखिल बंसल यांना सांगितलं. त्यावर बंसल यांनी अशा कुठल्याही प्रकारात आपला सहभाग नसल्याचं सांगत वकिलाला बोलावू देण्याची विनंती केली. मात्र त्या सहाजणांपैकी एकाने बंसल यांना बाजूला घेत हे प्रकरण पैसे देऊन इथेच मिटवण्याची विनंती केली. मात्र बंसल यांनी त्याला नकार दिला. त्यानंतर आरोपींनी बंसल आणि इतर कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करत तोडफोड सुरु केली. उपस्थित सर्वांना बंदुकीचा धाक दाखवत तिथून 2 लाख रुपये चोरून नेले. त्यानंतर बंसल यांनी पोलिसांत याची तक्रार केली. पोलिसांनी या भामट्यांचा शोध सुरु केला. काही तरुण नौगावच्या जंगलात घुसले असून तिथेच असल्याची माहिती पोलिसांना त्यांच्या सूत्रांकडून मिळाली. हे वाचा -शोभायात्रा झाली शवयात्रा! तरुणाने हाताने उचलली High Voltage तार; एकाचा मृत्यू अशी झाली अटक पोलिसांची एक टीम जंगलात गेली आणि तिथं असलेल्या आरोपींकडे विचारणा केली. त्यावेळी पोलिसांनाही त्यांनी आपण सीबीआय अधिकारी असल्याचं सांगत बनावट ओळखपत्र दाखवलं. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला आणि त्यांनी पोलिसी खाक्या दाखवत या आरोपींना सत्य सांगण्याचा इशारा दिला. त्यानंतर आरोपींनी आपला गुन्हा कबूल करत ‘स्पेशल 26’ या सिनेमावरून प्रेरणा घेत आपण दरोड्याची योजना आखल्याचं कबूल केलं. या सहा जणांना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: CBI, Madhya pradesh

    पुढील बातम्या