Home /News /crime /

कुटुंबाला बंदुकीचा धाक दाखवून लुटले 16 लाख, निघताना सर्वांचे मोबाईलही फोडले

कुटुंबाला बंदुकीचा धाक दाखवून लुटले 16 लाख, निघताना सर्वांचे मोबाईलही फोडले

एका कुटुंबाच्या घरात घुसून आणि त्यांना बंदुकीची (Revolver) धमकी दाखवून घरातील 16 लाख रुपये (16 lakh cash) दरोडेखोरांनी (thief) लुटून नेले.

    जयपूर, 8 ऑगस्ट : एका कुटुंबाच्या घरात घुसून आणि त्यांना बंदुकीची (Revolver) धमकी दाखवून घरातील 16 लाख रुपये (16 lakh cash) दरोडेखोरांनी (thief) लुटून नेले. घराच्या भिंतीवरून उडी मारून आलेले हे सहा दरोडेखोर मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमाराला घरात शिरले आणि त्यांनी लुटालूट केली. असा पडला दरोडा राजस्थानच्या जयपूर जिल्ह्यातील कोटपुतली गावात राजेश महावर आणि त्यांचे कुटुंबीय राहतात. हे सगळे कुटुंबीय जेवण करून एकाच खोलीत झोपले असताना घराच्या भिंतीवरून उढी मारून हे दरोडेखोर आत आले. सहाही दरोडेखोरांनी चेहरे रुमालांनी झाकलेले होते. घरात दरोडेखोर घुसल्याच्या आवाजाने महावर कुटुंबीयांना जाग आली. मात्र त्यांना बेडमधून उठून न देता शांत बसून राहण्याची धमकी  दरोडेखोरांनी दिली. बंदुकीची धमकी कुटुंबातील सर्वांना एकाच जागी बसून राहण्याची धमकी दरोडेखोरांनी दिली. जर कुणी आरडाओरडा केला, तर घरातील लहान मुलांना रिव्हॉल्व्हरने गोळ्या घालण्याची धमकी दिल्यामुळे घरातील सर्वांपुढे शांत राहण्यावाचून पर्याय नव्हता. दरोडेखोरांनी घरातील तिजोरी उघडली आणि त्यातील सुमारे 10 लाख रुपये किंमतीचे दागिने त्यांनी लंपास केले. त्यांना तिजोरीत एकाच बॅगेत ठेवलेले 6 लाख रुपयेदेखील सापडेल. तेदेखील त्यांनी स्वतःसोबत नेले. जाताना दरोडेखोरांनी सर्वांना एका खोलीत बंद केले. त्यांच्याकडी मोबाईल काढून घेऊन ते मोडून टाकले आणि बाहेरच्या मुख्य गेटला बाहेरून कुलूप लावत त्यांनी पोबारा केला. राजेश यांना पाजलं पाणी हा प्रकार सुरू असताना राजेश यांना धाप लागली आणि त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. आपण हार्ट पेशंट असल्याचं त्यांनी दरोडेखोरांना सांगितलं. त्यावेळी त्यातील एका दरोडेखोरानं त्यांना पाणी दिलं आणि एका जागी पडून राहायला सांगितलं, असं वृत्त दैनिक भास्करनं दिलं आहे. हे वाचा -WhatsApp हॅक करुन 9 लाखांची फसवणूक, संपूर्ण प्रकार ऐकून तुम्हीही व्हाल हैराण पोलीस तपास सुरू दरोडेखोर निघून गेल्यानंतर राजेश महावर आणि त्यांचे कुटुंबीय बाहेर आले. त्यांचा आरडाओरडा ऐकून शेजारी बाहेर आले. सर्वांनी मिळून पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून अद्याप दरोडेखोरांना काहीही तपास लागलेला नाही.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Crime, Jaipur

    पुढील बातम्या