जालना 27 नोव्हेंबर : रामनगर साखर कारखाना खरेदी प्रकरणी शिवसेनेचे (Shivsena) नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांच्या घरी ईडीचे (ED) पथक शुक्रवारी 2 वाजल्यापासून दाखल झालं होतं. ईडीचं पथक घरी पोहोचल्यामुळे एकच खळबळ उडाली. ईडीच्या पथकाकडून खोतकर यांची कसून चौकशी करण्यात आली. अखेर 12 तासांनी रात्री 2 वाजता ही चौकशी संपली.
जालन्यातील रामनगर साखर कारखाना खरेदी प्रकरणी भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी जालन्यातील शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्यावर आरोप केला होता. यानंतर शुक्रवारी जालन्यात ईडीचं पथक दाखल झालं होतं. या प्रकरणी तब्बल 12 तास ED चं पथक खोतकरांच्या घरीच ठाण मांडून होतं. खोतकरांचा जवाब नोंदविण्याची प्रक्रिया यावेळेत सुरू होती.
अर्जुन खोतकर यांची चौकशी रात्री 2 वाजता संपल्यानंतर ईडीचं पथक औरंगाबादकडे रवाना झालं. ईडीकडून खोतकर यांची सलग 12 तास चौकशी केली गेली. या पथकाने रामनगर साखर कारखाना खरेदी प्रकरणी जालना बाजार समितीच्या मुख्य कार्यालयात जाऊन चौकशी केली आहे.
किरीट सोमय्या यांनी असा आरोप केला होता, की राज्य सरकारची 100 एकर जमीन बळकवण्याचा अर्जुन खोतकर यांचा प्रयत्न सुरू आहे. शेतकऱ्यांनी जी जमीन कारखान्यासाठी दिली आहे त्याची आज मार्केट व्हॅल्यू 1 हजार कोटींच्या आसपास आहे. साखर कारखाना तर कधी चालू झालाच नाही. कामगाराचे पैसेही दिले नाही. पण त्या जागेवर बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉम्पलेक्स बांधण्याचा प्रयत्न सुरू आहे. या संबंधी अनेक शेतकऱ्यांनी माझ्याकडे तक्रारी केल्या. त्या तक्रारी मी ईडीपासून राज्य मंत्रालयापर्यंत दिल्या. यासोबतच खोतकरांनी रामनगर साखर कारखाना बेनामी पद्धतीने घेतला, असाही आरोप सोमय्यांनी केला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Case ED raids, Shivsena