सांगली, 12 एप्रिल : ''राजू शेट्टीला पाडायला भाजप आणि सेना लागत नाही. शरद पवार हे खूप हुशार नेते आहेत. मग ते त्यांना सोडतील का?'' अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली. सांगलीच्या इस्लामपूरमध्ये भाजप सेनेच्या युतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. ''पवारांनी आत्तापर्यंत अनेकांना फसवलंय. वसंतदादा, विखे पाटीलांनंतर आता राजू शेट्टी यांना ये-ये म्हणत त्यांनी पिंजऱ्यात घेतलंय'' असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chandrakant patil, Election 2019, Lok sabha election 2019, Sangli S13p44