Home /News /maharashtra /

मोठी बातमी! सिंधुदुर्गात कोरोनाचा समूह संसर्ग; संपूर्ण जिल्ह्यात Lockdown जाहीर

मोठी बातमी! सिंधुदुर्गात कोरोनाचा समूह संसर्ग; संपूर्ण जिल्ह्यात Lockdown जाहीर

Lockdown in Sindhudurg: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.

सिंधुदुर्ग, 8 मे: कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात कडक लॉकडाऊन (Sindhudurg Lockdown) लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उद्या रात्री 12 वाजल्यापासून ते 15 मे पर्यंत हा कडक लॉकडाऊन असणार आहे अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी दिली आहे. जिल्ह्यात कोरोनाचा समूह संसर्ग सिंधुदुर्गचे पालकमंत्री आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लावण्याचं जाहीर केलं आहे. यावेळी उदय सामंत यांनी म्हटलं, सिंधुदुर्ग जिल्ह्यात जवळपास 2 लाख नागरिक बाहेरून आले आहेत. तसेच जिल्ह्यात आतापर्यंत 50 ते 60 नागरिकांना सामुदायिक संसर्ग म्हणजेच कम्युनिटी स्पेड (Coronavirus community spread in Sindhudurg) झाला असल्याचंही त्यांनी मान्य केलं आहे. जिल्ह्यातील सोनाळी आणि दिक्षी या गावांत कोरोनाचा समूह संसर्ग झाला आहे. जिल्ह्यात येण्यापूर्वी स्वॅब टेस्ट बंधनकारक, पर्यटकांना बंदी कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या नागरिकांना आधी स्वॅब टेस्ट करणे बंधनकारक असणार आहे. तसेच पर्यटकांसाठी जिल्हाबंदी असल्याचंही पालकमंत्र्यांनी म्हटलं आहे. निर्बंधांचे उल्लंघन केल्यास कारवाई 15 मे 2021 पर्यंत हा कडक लॉकडाऊन असणार आहे आणि गेल्यावर्षी प्रमाणेच हा सुद्दा लॉकडाऊन असणार आहे. निर्बंधांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे असंही उदय सामंत यांनी म्हटलं आहे. वाचा: Vaccineसाठी इतर राज्यांनी चेक दिले पण महाराष्ट्राने नाही - भाजप उदय सामंत यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे सिंधुदुर्ग जिल्ह्यात बाहेरून आलेल्या लोकांची संख्या 2 लाख झाली आहे. जिल्ह्यात 50 ते 60 लोकांना सामुदायीक संसर्ग झाल्याचं समोर आलंय सकाळी 7 ते 11 पर्यंत दुकानं उघडी रहातील मात्र ग्राहक दुकानात येणार नाहीत तर विक्रेता ग्राहकांना घरपोच सेवा देईल. शेती कामांना परवानगी असणार रेशन दुकानांना सकाळी 7 ते 11 पर्यंत शिधापाटप करण्यास परवानगी जिल्ह्याबाहेरून येण्या आधी स्वँब टेस्ट आवश्यक पर्यंटकांसाठी जिल्हा बंद गेल्या वर्षी प्रमाणे आता कडक लॉकडाऊन असेल कडक निर्बंधांचं उल्लंघण करणार्यांवर प्रशासन योग्य ती कारवाई करेल
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Coronavirus, Lockdown, Sindhudurg

पुढील बातम्या