Home /News /mumbai /

Vaccineसाठी इतर राज्यांनी चेक दिले पण महाराष्ट्राने नाही; बीएमसीकडे अफाट पैसा तो खर्च करून लस विकत घ्यावी : भाजपचं CMला आवाहन

Vaccineसाठी इतर राज्यांनी चेक दिले पण महाराष्ट्राने नाही; बीएमसीकडे अफाट पैसा तो खर्च करून लस विकत घ्यावी : भाजपचं CMला आवाहन

BJP on Covid vaccination: केंद्र सरकार राज्याला भरभरून देत आहे तरीही केंद्राकडून काहीच मिळत नाही असं राज्य सरकार बोलत आहे आणि हे बोलनं चुकीचं असल्याचं भाजपने म्हटलं आहे.

मुंबई, 8 मे: राज्यात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण (Vaccination) मोफत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या नागरिकांसाठी आवश्यक असलेले लसींचे डोस विकत घेण्यासाठी राज्य सरकार (Maharashtra Government) एक रकमी चेक देण्यासाठी तयार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं. याच मुद्द्यावरुन आता भाजपने (BJP) महाविकास आघाडी सरकारवर (Maha Vikas Aghadi Government) हल्ला चढवला आहे. इतर राज्यांनी चेक दिले मात्र, महाराष्ट्राने अद्याप दिलेच नाहीत असं वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी केलं आहे. नेमकं काय म्हणाले प्रवीण दरेकर? 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लस मोफत देणार असं राज्य सरकारने सांगितलं होंतं पण प्रत्यक्षात राज्य सरकारने काय केलं...? इतर राज्यांनी लस उत्पादक कंपन्यांना चेक दिलेत मात्र राज्य सरकारने दिलेला नाही. आमचं मुख्यमंत्र्यांना आवाहन आहे की, बीएमसीकडे 50 ते 60 हजार कोटींच्या ठेवी आहेत. त्यामुळे 150 कोटी रूपये देऊन लस विकत घ्याव्यात. केंद्राकडे बोट दाखवून स्वत:चं अपयश झाकू नये. राजस्थान आणि गुजरात पैक्षाही जास्त लस राज्याला मिळाल्या आहेत. लस देण्याचं राज्याने काय नियोजन केलं आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केला. केंद्राच्या नावाने राज्य ओरड करत आहे सांगली आणि सातारा जिल्ह्यांना सहा ते साडेसहा लाख लस मिळाल्या त्याचवेळी सिंधूदूर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्याना दीड ते 2 लाखांपर्यंत मिळाल्यात. 4 लाख 53 हजार डोस आज राज्यात आहेत. तरीही लस उपलब्धं नाही अशी ओरड राज्य सरकार करत आहे. लसीकरण केंद्रावर नियोजन नसल्यामुळे बोजवारा उडाला आहे. लसीकरण केंद्राबाहेर काही सुविधा उपलब्ध केल्या पाहीजेत. वाचा: 'Corona Vaccine पुरवा, 24 तास 3 शिफ्टमध्ये काम करून लसीकरण मोहीम फत्ते करतो,' मुंबईच्या महापौरांचे आवाहन केंद्र सरकार राज्य सरकारला भरभरून देत आहे असं असतानाही केंद्र सरकारकडून काहीच मिळत नाही हे बोलनं चूकीचं आहे. शेतकऱ्यांना बांधावर जाऊन जसं सांगितलं होतं तसं आता मोफत लसीकरणाबाबत होणार नाही ना...? जनतेला लवकर मोफत लस द्यावी अशी मागणी आम्ही करतोय असंही प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात जे लसीकरण झालं ते केंद्रामुळे झालं खासदार मनोज कोटक यांनीही म्हटलं की, बीएमसीकडे गेले दहा बारा दिवस आम्ही पाठपुरवठा करतोय. बीएमसीकडे अफाट पैसा आहे. खासदार राहुल शेवाळे यांनीही तशी मागणी केलीय. 150 कोटी रुपये खर्चून लस घेतली पाहीजे. सरकार म्हणतेय की चेक तयार आहे, मग हा चेक आता कुठपर्यंत आहे...? इतर खासगी संस्थांकडे लस येते मात्र बीएमसी कडे येत नाही...? बीएमसीने ऑनलाईन ऑफलाईन चा खेळ थांबवावा. 24 वॉर्डात फक्त वरिष्ठ नागरिकांसाठी लसीकरण केंद्र सुरू करावे. मुंबई महाराष्ट्रात जेव्हढं लसीकरण झालंय ते फक्तं केंद्र सरकारकडून झालंय. ड्रायव्ह इन लसीकरण केंद्र अजूनही सुरू झालेले नाहीये. बीएमसी आणि राज्य सरकारचा घोळ सुरू केला आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Corona vaccine, Coronavirus, Maharashtra

पुढील बातम्या