रायगड, 3 फेब्रुवारी: सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी (Bullock cart race in Maharashtra) दिली आणि त्यामुळे शर्यतीचा मार्ग मोकळा झाला. राज्यात आता विविध ठिकाणी बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात येऊ लागलं आहे. रायगड (Raigad) मध्ये सुद्धा बुधवारी (2 फेब्रुवारी 2022) एका बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, या बैलगाडा शर्यतीत मोठी दुर्घटना घडली आहे. बैलजोडी थेट प्रेक्षकांवर आल्याने तिघेजण जखमी झाले आहेत. या घटनेचा अंगावर काटा आणणारा लाईव्ह व्हिडीओ सुद्धा समोर आला आहे. (Live video of accident during bullock cart race in Nandgaon Raigad district)
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील नांदगाव येथे ही बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली होती. भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी शैलेश काते यांच्या वाढदिवसानिमित्त सदर बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. बैलगाडी शर्यत सुरू होताच अचानक एक बैलगाडी प्रेक्षकांच्या अंगावर आली. ही संपूर्ण घटना मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
रायगडमध्ये बैलगाडा शर्यतीत मोठी दुर्घटना; बैलजोडी थेट प्रेक्षकांच्या अंगावर pic.twitter.com/1NJR8AERxC
— News18Lokmat (@News18lokmat) February 3, 2022
समुद्र किनारी या बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आले होते. बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक तेथे उपस्थित झाले होते. बघ्यांनी मोठी गर्दी केली आणि बैलगाडा शर्यत सुरू झाली. तितक्यात एक बैलजोडी थेट प्रेक्षकांच्या अंगावर आली. या अपघातात तिघेजण जखमी झाले आहेत. या बैलगाडा शर्यतीचं उद्घाटन आमदार महेंद्र दळवी, भाजपा जिल्हा अध्यक्ष ॲड महेश मोहिते, काँग्रेसचे युवा नेते राजेंद्र ठाकूर यांच्या उपस्थित करण्यात आले होते.
वाचा : हळदीत अतिउत्साही नवरदेवाने नाचवली तलवार अन् पोहोचला थेट कारागृहात, VIDEO VIRAL
नाशिकमध्ये बैलगाडा शर्यतीत बैलजोडी उधळली अन्...
25 डिसेंबर रोजी नाशिक जिल्ह्यातही बैलगाडा शर्यतीचं आयोजन कऱण्यात आलं होतं. या बैलगाडा शर्यतीत विविध ठिकाणाहून बैलगाडी शर्यतप्रेमी दाखल झाले होते. ही बैलगाडा शर्यात पार पडल्यानंतर त्याला जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी नसल्याचं समोर आलं होतं. नाशिक जिल्ह्यातील ओझरमध्ये ही बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आले होते. या बैलगाडा शर्यतीत एक बैल जोडी उधळली.
या शर्यतीत सहभागी होण्यासाठी ठिकठिकाणाहून बैलगाडा मालक शर्यतीसाठी आपल्या बैलजोडी घेऊन दाखल झाले होते. मात्र, या बैलगाडा शर्यतीत एक बैल जोडी अनियंत्रित झाली आणि शेजारी असलेल्या बाईकवर आदळली. यामुळे दोन्ही बैलांचे शिंग हे गाडीत अडकले. सुदैवाने यात कुणालाही दुखापत झालेली नाहीये.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bull attack, Live video, Pune, Raigad, Raigad news, Shocking accident, महाराष्ट्र