नागपूर, 28 एप्रिल: लॉकडाऊनच्या काळात राज्यात सर्वत्र निर्बंधांची कडक अंमलबजावणी होत असताना नागपूर पोलिसांनी दारु तस्कारांचा पर्दाफाश केला आहे. एका फार्मसीच्या मालकाने दारूची तस्करीच्या इराद्याने मित्राच्या मदतीने पोलिसांकडून सवलत असलेल्या वाहनात सलाईनच्या डब्यात चक्क दारूच्या बाटल्या ठेवल्या होत्या. या टोळीला तहसील पोलिसांनी अटक करून त्यांच्या ताब्यातून रोख रुपये 2 लाख 78 हजार 100 रुपये आणि 23 हजार 868 रुपयांची दारू जप्त केली. हेही वाचा.. रात्रभरात 1200 जणांना क्वारंटाईन करणार, IAS अधिकाऱ्यानं उचललं कठोर पाऊल असं आहे हे प्रकरण… लॉकडाऊनमुळे दारूच्या व्यवसायात आता चौपट नफा असल्याचे लक्षात येताच फार्मसी मालक राहूल सदावर्ते याने दारू तस्करीचा व्यवसाय सुरू केला. मागील महिन्यांपासून त्यांचा हा गोरखधंदा सुरू होता. दारूच्या पेट्या आणण्यासाठी आरोपी चारचाकी वाहनाचा वापर करीत होते. चारचाकी वाहनाच्या काचेवर ‘जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक’ असे स्टिकर लावत होते. त्यामुळे कुणीही त्यांच्यावर संयश घेत नव्हते. शहरात दारूची दुकाने बंद असताना देखील तहसील परिसरात मोठ्या प्रमाणात दारू विकल्या जाते, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. हेही वाचा.. ..तर कोरोना त्यांच्या जीवावर बेतू शकतो, असं म्हणत राज ठाकरेंनी केली ही मागणी पोलिसांनी माहिती काढली असता चौघांचीही माहिती समोर आली. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर पाळत ठेवली. त्यांना पकडण्यासाठी मेयो हॉस्पिटल चौक आणि गोळीबार चौकात नाकेबंदी करण्यात आली होती. रविवारी रात्री चारही आरोपी हे कारने गोळीबार चौकात आले. पोलिसांनी त्यांना अडवून पाहणी केली असता कारमध्ये सलाईनचे बॉक्स आणि त्याखाली दारूच्या पेट्या मिळून आल्या. पोलिसांनी सलाईनच्या आणि दारूच्या पेट्या, कारसह 12 लाख 11 हजार 958 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दारूच्या पेट्या त्यांनी भिवापूर येथून आणल्याची कबुली दिली, अशी माहिती पोलिस निरीक्षक जयेश भांडारकर यांनी दिली आहे. संपादन- संदीप पारोळेकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.