मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

महाराज आम्हाला माफ करा! किल्ले रायगडावर सापडल्या दारूच्या बाटल्या अन् 1200 बॅग प्लास्टिक कचरा

महाराज आम्हाला माफ करा! किल्ले रायगडावर सापडल्या दारूच्या बाटल्या अन् 1200 बॅग प्लास्टिक कचरा

रायगडावर येणाऱ्या पर्यटक आणि शिवप्रेमींची पुरातत्व विभागामार्फत तपासणी केली जाते, अशा परिस्थितीत किल्ले रायगडावर दारू येते कशी?

रायगडावर येणाऱ्या पर्यटक आणि शिवप्रेमींची पुरातत्व विभागामार्फत तपासणी केली जाते, अशा परिस्थितीत किल्ले रायगडावर दारू येते कशी?

रायगडावर येणाऱ्या पर्यटक आणि शिवप्रेमींची पुरातत्व विभागामार्फत तपासणी केली जाते, अशा परिस्थितीत किल्ले रायगडावर दारू येते कशी?

रायगड, १५ मे - छत्रपती शिवाजी महाराज (chhatrapati shivaji maharaj) यांची राजधानी असलेल्या रायगडावर (Fort Raigad) साफसफाई करत असताना दारूच्या बाटल्या आढळून आल्याची शरमेची घटना समोर आली आहे. एवढंच नाहीतर रायगडावर तब्बल 1200 बॅग प्लॉस्टिकचा कचरा गोळा करण्यात आला आहे. रायगडावर मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या सापडल्यामुळे शिवभक्तांमध्ये नाराजी पसरली आहे.

दुर्गरक्षक फोर्स या संघटनेमार्फत गेली चौदा दिवस किल्ले रायगडावर स्वच्छता मोहिम राबवण्यात आली होती.1 मे ते 14 मे सलग 14 दिवस स्वच्छता मोहिम राबवण्यात आली. या स्वच्छता मोहिमेसाठी हजारो शिवप्रेमी आणि पर्यटकांचे मदतीचे हात लागले असून सुमारे 1200 बॅग प्लास्टिक कचरा यादरम्यान गोळा करण्यात आला.किल्ल्यावरील झाडी झुडप, डोंगर आणि दगडांमधून हा कचरा गोळा करण्यात आला.

या मोहिमेदरम्यान मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या आढळून आल्या आहेत. रायगडावर जाण्यासाठी किल्याचे पावित्र राखण्यासाठी वारंवार सुचना केल्या जात असता. पण, तरीही काही महाभाग हे दारूच्या बाटल्या गडावर घेऊन जात असल्याचे समोर आले आहे.

('राज ठाकरेंना अयोध्येत पाय ठेवू देणार नाही, हनुमानजी त्यांना वरुनच उचलून घेतील', भाजप खासदाराचा इशारा)

किल्ले रायगडवरील या स्वच्छता मोहिमेदरम्यान जिल्हा परीषद विश्रामगृह, समाधीस्थळ, बाजार पेठ, होळीचा माळ या भागात मोठ्याप्रमाणात दरुच्या बाटल्या सापडल्या आहेत. यामुळे स्वच्छतेचे काम करणाऱ्या स्वयंसेवकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

रायगडावर येणाऱ्या पर्यटक आणि शिवप्रेमींची पुरातत्व विभागामार्फत तपासणी केली जाते, अशा परिस्थितीत किल्ले रायगडावर दारू येते कशी असा सवाल स्वच्छता करणाऱ्या स्वयंसेवकांकडून केला जात आहे. याआधीही असे प्रकार समोर आले होते. याची शिवप्रेमींनी तक्रार केली होती.

(गावचा महसूल गोळा करणाऱ्या तलाठ्यांना शासनाकडून दिलेले अधिकार माहिती आहेत का?)

विशेष म्हणजे,महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर किल्ले संवर्धनासाठी विशेष निधीही तरतूद करण्यात आला आहे. पण, असं असतानाही किल्ले रायगडाचे पावित्र्य जपण्याचे काम सामन्य नागरिकच पायदळी तुडवत असल्याचे समोर आले आहे.

First published: