मुंबई, 8 सप्टेंबर : गेल्या दोन तासांपासून मुंबई आणि उपनगरात पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे. काही तासांत इतका पाऊस झाला की, मुंबई-ठाण्यातील रस्त्यांची स्थितीच बदलली. ठिकठिकाणी पाणी जमा झालं आहे. रूळावर पाणी साचल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. पुढील काही तास मुंबई आणि उपनगरात तुफान पाऊस कोसळणार असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. कळवा, मुंब्रा, दिवा, डोंबिवली कल्याण येथे अनेक ठिकाणी पाणी भरले आहे. कल्याण रेल्वे स्थानकाजवळही पाणी जमा झाले आहेत. मुसळधार पावसामुळे ठाण्यापासून पुढे रेल्वे वाहतूक खोळंबली आहे.
Thunder Show from yesterday in Mumbai ⚡⛈️ #WassupMumbai #MumbaiRains Credit: IG vibhutibandekar pic.twitter.com/myQAVkxv6T
— Wassup Mumbai (@Wassup_Mumbai) September 8, 2022
सुरुवातीला नाहूर ते विक्रोळी दरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर वाहतूक धिम्या गतीने सुरु झाल्याची माहिती समोर आली होती.
Flash floods in Mulund #MumbaiRains pic.twitter.com/cws2rwKL12
— Mumbai Nowcast (@MumbaiNowcast) September 8, 2022
ही माहिती ताजी असतानाच आता आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतुकीवर प्रचंड मोठा परिणाम झाला आहे. ठाण्यापासून पुढे कळवा ते कल्याणपर्यंत वाहतूक खोळंबली आहे.
#MumbaiRains
— Siraj Noorani (@sirajnoorani) September 8, 2022
Amrutnagar, Mumbra #Thane pic.twitter.com/RgomFX53FS
महाराष्ट्रात येत्या 5 दिवसात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने व्यक्त केला आहे. उद्यापासून मुंबई आणि ठाणे परिसरासह कोकण आणि मध्य महाराष्ट्र भागात त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. पश्चिममध्य व लगतच्या पूर्वमध्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. तर ओडिशा, महाराष्ट्र व दक्षिण द्वीपकल्पीय भारतात पुढील 4-5 दिवसांत मुसळधार पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. वायव्य भारतातील मैदानी भागात पुढील 5 दिवसांत पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे.