जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Latur News: वऱ्हाड निघालं एसटीनं, लातूरमध्ये लालपरीचा पराक्रम, वाचा काय घडलं नेमकं? Video

Latur News: वऱ्हाड निघालं एसटीनं, लातूरमध्ये लालपरीचा पराक्रम, वाचा काय घडलं नेमकं? Video

Latur News: वऱ्हाड निघालं एसटीनं, लातूरमध्ये लालपरीचा पराक्रम, वाचा काय घडलं नेमकं? Video

Latur News: वऱ्हाड निघालं एसटीनं, लातूरमध्ये लालपरीचा पराक्रम, वाचा काय घडलं नेमकं? Video

लातूरमध्ये विवाह सोहळ्यांसाठी एसटीची मागणी वाढली आहे. त्यामुळे लाल परीने पाच दिवसांत विक्रमी नफा कमावला आहे.

  • -MIN READ Latur,Maharashtra
  • Last Updated :

ऋषिकेश होळीकर, प्रतिनिधी लातूर, 19 मे: नेहमी तोट्यात असणाऱ्या एसटीला आता चांगले दिवस आले आहेत. विवाह सोहळे आणि विविध सवलतीच्या योजनांमुळे प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. एकट्या लातूर आगारात गेल्या पाच दिवसात दोन लाख 22 हजार 854 व्यक्तींनी प्रवास केला असून एक कोटी 57 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. एकूण दोन कोटी 66 लाख रुपयांचा व्यवसाय लातूर आगारात फक्त पाच दिवसात झाला आहे. त्यामुळे नकारात्मक मानसिकतेतून एसटी बाहेर पडली असून व्यवसाय वृद्धीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये नवचैतन्य आले आहे.

News18लोकमत
News18लोकमत

प्रवाशांसाठी विविध योजना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी प्रवासासाठी सध्या विविध योजना लागू केल्या आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी अमृत योजनेतून मोफत प्रवास आहे. तर महिला सन्मान योजनेत 50% सवलत तर दिव्यांग व्यक्तीसाठी 75 टक्के सवलत योजना आहे. तसेच चार दिवस प्रवासी योजनाही राबविण्यात येत आहे. त्यामुळे एसटीला प्रवाशांचा प्रतिसाद वाढला आहे. यामुळे गेल्या चार दिवसात लातूर आगारात दोन कोटी 66 लाख रुपयांचे उत्पादन मिळाले आहे. उन्हामुळे मोबाईल बंद पडतोय का? अशी घ्या काळजी, पाहा Video 5 दिवसांत विक्रमी प्रवासी संख्या लातूर विभागातील औसा, लातूर निलंगा, उदगीर आणि अहमदपूर हे पाच आगार असले तरी फक्त लातूर आगारात गेल्या पाच दिवसात दोन लाख 22 हजार 854 प्रवाशांनी प्रवास केला आहे. या प्रवाशांकडून 2 कोटी 66 लाख 66 हजार 190 रुपयांचे उत्पन्न लातूर आगाराला मिळाले आहे. एवढे उत्पन्न लग्नसराई, यात्रा, महोत्सव काळात मिळत नव्हते. वेगवेगळ्या योजनांमुळे प्रवासी एसटीकडे आकर्षित झाले आहेत. त्यामुळे एसटीचा कोर्स आता सुधारत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: latur , Local18 , st bus
  • First Published :
जाहिरात
जाहिरात