लातूर, 6 जुलै: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने फायद्याची योजना सुरू केली आहे. आपली जमीन सरकारला भाड्याने दिल्यास हेक्टरी 1लाख 25 हजार रुपये मिळणार आहेत. शेतकऱ्यांना दिवसा आणि अखंडित वीज पुरवठा मिळावा यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 ही नवीन योजना राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी भाड्याने जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना आता हेक्टरी 75 हजार ऐवजी एक लाख 25 हजार रुपये वार्षिक दिले जाणार आहेत. शिवाय दरवर्षी तीन टक्क्यांनी वाढ राहणार आहे. काय आहे सौर कृषी वाहिनी योजना? शेतकऱ्यांची सोय आणि त्यांच्या मागणीनुसार कृषी पंपांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी महावितरणच्या वतीने मागील काही वर्षांपासून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू होती. त्या योजनेस राज्यात चांगला प्रतिसाद राहिला. दरम्यान 8 मे 2023 पासून राज्य शासनाने या योजनेस अधिक व्यापक स्वरूप देत लोकसहभाग वाढवण्याचा निर्णय झाला.त्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषीवाहिनी योजना 2.0 या नावाने योजना पुढे सुरू ठेवली आहे. या नव्या योजनेत शेतकऱ्यांना हेक्टरी 75 हजारांऐवजी एक लाख 25 हजार रुपये भाडे देण्यात येणार आहे. शिवाय यामध्ये दरवर्षी तीन टक्क्यांनी वाढ होणार आहे.
कोणता शेतकरी देऊ शकतो जमीन? या योजनेसाठी शासकीय आणि खाजगी अशा दोन्ही क्षेत्रातील जमिनीचा वापर करण्यात येत आहे. यातून शेतकऱ्यांना नियमित उत्पादनाची संधी मिळत आहे. महावितरणच्या वीज वितरण केंद्रापासून पाच किलोमीटर अंतरावरील शेतकरी या योजनेत आपली जमीन देऊ शकतात. किमान तीन आणि अधिकाधिक 50 एकर पर्यंत जमीन सौर ऊर्जेसाठी भाड्याने देता येणार आहे. पाच पिढ्यांचा साक्षीदार पुन्हा राहिला उभा, पाहा कशी दिली वटवृक्षाला संजीवनी, Video ग्रामपंचायतींनाही घेता येणार सहभाग वीज उपकेंद्रापासून जवळील जमिनीला योजनेत प्राधान्य असेल. या अभिनयानात शेतकऱ्याने उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात येत आहे. या अभियानामध्ये ज्या ग्रामपंचायती सहभाग घेणार आहेत त्यांना 15 लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे.