मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Latur News: लातूरच्या गाईची शिर्डीत बाजी; पशुप्रदर्शनात देवणी वळू अव्वल, Video

Latur News: लातूरच्या गाईची शिर्डीत बाजी; पशुप्रदर्शनात देवणी वळू अव्वल, Video

X
लातूर

लातूर जिल्ह्यातील हासेगाववाडी येथील बालाजी जाधव हे देवणी जातीच्या गोवंशाचे पालन करतात. शिर्डी येथील पशुप्रदर्शनात त्याच्या गाय व वळूने पहिला क्रमांक पटकावला.

लातूर जिल्ह्यातील हासेगाववाडी येथील बालाजी जाधव हे देवणी जातीच्या गोवंशाचे पालन करतात. शिर्डी येथील पशुप्रदर्शनात त्याच्या गाय व वळूने पहिला क्रमांक पटकावला.

 • News18 Lokmat
 • Last Updated :
 • Latur, India

  ऋषिकेश होळीकर, प्रतिनिधी

  लातूर, 1 एप्रिल: नुकतेच शिर्डी येथे महाराष्ट्र सरकार मार्फत महा एक्स्पो अंतर्गत पशुप्रदर्शन भरविण्यात आले होते. यामध्ये लातूर जिल्ह्यातील हासेगाववाडी येथील बालाजी जाधव यांची देवणी जातीची गाय व वळू यांना प्रथम पारितोषक मिळाले आहे. प्रथम पारितोषक मिळाल्यानंतर गावात गावकऱ्यांनी जंगी स्वागत करून गाय व वळू यांची मिरवणूक काढली. आत्तापर्यंत बालाजी जाधव यांच्या गोवंशाला 40 ते 50 पारितोषिके प्राप्त झाली आहेत.

  शिर्डीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव

  बालाजी जाधव यांच्या गोवंशाला भारतातील विविध ठिकाणी गौरविण्यात आले आहे. शिर्डी येथे झालेल्या महाएक्स्पो प्रदर्शनात गाय व बैल दोन्हींचा पहिला क्रमांक आला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 51 हजार रुपये व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

  तीन पिढ्यांची गोपालनाची परंपरा

  हासेगाववाडी येथील बालाजी जाधव यांची तिसरी पिढी देवणी गोवंशाचे पालन करत आहे. त्यांच्याकडे गाई व बैल मिळून 15 देवणी गोवंश आहेत. शेतीला जोडधंदा म्हणून ते गोवंश पालन करतात. बाजाली जाधव गाय व बैल यांना देशभरातील विविध पशुप्रदर्शनात घेऊन जातात. आत्तापर्यंत विविध 40 पुरस्कारांनी त्यांच्या गोवंशाला सन्मानित करण्यात आले आहे. त्यामुळे हासगाववाडीची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.

  देवणी जातीच्या गोवंशाला मागणी

  लातूर जिल्ह्यातील देवणी गोवंशाला मराठवाड्यासह परराज्यातूनही मागणी आहे. कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात देवणी बैलाला मागणी आहे. महाराष्ट्रातील लातूर, उस्मानाबाद, परभणी, नांदेड या जिल्ह्यामध्ये देवणी बैलांना जास्त मागणी असते. लातूर जिल्ह्यातील देवणी, निलंगा, औसा, उदगीर या तालुक्यात जास्त प्रसिद्ध आहे. ही गाय लातूर, उस्मानाबाद, परभणी सह कर्नाटकातील बिदर मध्ये मोठ्या प्रमाणात आढळते.

  चक्क बकरा देतोय दूध, नाव आहे बादशाह, किंमत ऐकून व्हाल हैराण, पाहा VIDEO

  देवणी गोवंशाची वैशिष्ट्ये काय?

  लातूर भागात असणाऱ्या कंधारी वंशाच्या तुलनेत देवणी गोवंश अधिक ताकदवान मानला जातो. तसेच देवणी गोवंश दिसायला देखणा आहे. गाय दूध व्यवसायासाठी वापरली जाते. एकावेळी 3 ते 15 लिटर दूध देवणी जातीच्या गायी देतात. तर बैल ताकदवान असल्याने शेती कामात वापरतात. व्यापक आणि रुंद कान, गुळगुळीत आणि मऊ त्वचा ही देवणीची सर्वसामान्य वैशिष्ट्ये आहेत.

  First published:
  top videos

   Tags: Latur, Local18