साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी
कोल्हापूर, 18 मार्च : सध्या अनेक ठिकाणी अवकाळी पावसामुळे शेतीचे बरेच नुकसान होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे कोल्हापूर येथील ग्रामिण कृषि मौसम सेवा केंद्राकडून पुढील काही दिवसाचा हवामान अंदाज वर्तवण्यात आला आला आहे. पुढचे काही दिवस सरासरी अंशतः ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्या पिकाची कशी काळजी घ्यावी याबाबत सविस्तर सल्ला दिला आहे.
कसे असेल हवामान ?
कोल्हापूर सांगली आणि सातारा या तीन जिल्ह्यांसाठी कोल्हापूर येथील विभागीय विभगीय कृषी संशोधन केंद्र मार्फत ही माहिती देण्यात आली आहे. केंद्राला प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक 18 ते 19 मार्च दरम्यान आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तर दिनांक 18 ते 20 मार्च रोजी तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात कमाल तापमान 32.0° ते 34.0° सेल्सिअस, सांगली जिल्ह्यात कमाल तापमान 33° ते 34° सेल्सिअस आणि सातारा जिल्ह्यामध्ये कमाल तापमान 30.0° ते 31.0° सेल्सिअस दरम्यान तर किमान तापमान अनुक्रमे 21° ते 22°, 19° ते 21° आणि 15° ते 16° सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यामध्ये अनुक्रमे वाऱ्याचा वेग ताशी 12 किमी पर्यंत, 12 ते 14 किमी आणि 11 ते कि.मी. दरम्यान राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असल्याने पक्व गहू, ज्वारी व हरभरा पिकांची त्वरित काढणी व मळणी करावी आणि तयार शेतीमाल सुरक्षित ठेवावा, अशा सूचनाही देण्यात आलेल्या आहेत.
'या' पिकांची घ्या काळजी
रब्बी ज्वारी : पाऊस नसेल त्या वेळी पक्व झालेल्या ज्वारी पिकाची त्वरित काढणी आणि मळणी करून घ्यावी व तयार शेतीमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा. त्वरित मळणी करणे शक्य नसल्यास काढलेली कणसे पॉलीथिनच्या पेपरने झाकून घ्यावीत. ज्वारी काढणी नंतर कडबा सुरक्षित ठिकाणी ठेवावासुरक्षित ठिकाणी ठेवणे शक्य नसल्यास ज्वारी कडबा पॉलीथिनच्या पेपरने झाकून घ्यावा.
गहू : पाऊस नसेल त्या वेळी पक्व झालेल्या गहू पिकाची त्वरित काढणी आणि मळणी करून घ्यावी. मळणी करून तयार झालेला शेती माल सुरक्षित ठिकाणी ठेवावा.
हरभरा : पाऊस नसेल त्या वेळी पक्व झालेल्या हरभरा पिकाची त्वरित काढणी आणि मळणी करून घ्यावी. मळणी करून तयार झालेला शेती माल सुरक्षित ठिकाणी ठेवावा.
Onion Subsidy : सरकारी अनुदान म्हणजे थट्टा, शेतकऱ्यानं समजावलं कांद्याचं गणित, पाहा Video
टोमॅटो : वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता असल्याने टोमॅटो पिकास काठीचा आधार दयावा.
आंबा : वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता असल्याने नवीन लागवड केलेल्या आंबा फळ झाडांना काठीचा आधार दयावा.
द्राक्ष : पक्व झालेल्या द्राक्ष घडांची त्वरित काढणी करावी व सुरक्षित ठिकाणी ठेवावेत. बागेमध्ये पावसाचे पाणी साठणार नाही यासाठी चर काढावेत.
पशुधन : जनावरे शक्यतो बाहेर चारावयास नेऊ नयेत. जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत.
पोल्ट्री पक्षी : पोल्ट्री पक्षी पक्क्या शेडमध्ये सुरक्षित ठिकाणी ठेवावेत.
(टीप : वरील सर्व माहिती ग्रामीण कृषि मौसम सेवा ऐएमएफयु कोल्हापूर, विभागीय कृषि संशोधन केंद्र, शेंडा पार्क, कोल्हापूर यांच्याकडून देण्यात आली आहे.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Agriculture, Farmer, Kolhapur, Local18