जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / थायलंडमधील जलतरण स्पर्धेत कोल्हापूरकर चमकले, 2 पदकांची केली कमाई

थायलंडमधील जलतरण स्पर्धेत कोल्हापूरकर चमकले, 2 पदकांची केली कमाई

थायलंडमधील जलतरण स्पर्धेत कोल्हापूरकर चमकले, 2 पदकांची केली कमाई

थायलंड येथील आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत कोल्हापूरच्या दोन खेळाडूंनी पदक आपल्या नावे करत कोल्हापूरचे नाव पुन्हा उंचावले आहे.

  • -MIN READ Local18 Kolhapur,Kolhapur,Maharashtra
  • Last Updated :

    कोल्हापूर, 17 डिसेंबर : कोल्हापूर चे खेळाडू सध्या जगभरात आपला डंका वाजवत आहेत. नुकतीच ओशनमॅन आशियाई चॅम्पियनशिप 2022 जलतरण स्पर्धा थायलंड येथे पार पडली. यामध्ये जगभरातून 250 हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. यामध्ये भारतातील 12 तर महाराष्ट्रातील 6 स्पर्धकांचा समावेश होता. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कोल्हापूरच्या दोन खेळाडूंनी पदक आपल्या नावे करत कोल्हापूरचे नाव पुन्हा उंचावले आहे. या जलतरण स्पर्धांमध्ये 9 वर्षांखालील गटात ओशन कीड 1 किमी पोहणे या प्रकारात श्लोक पांडव याने सुवर्ण पदक पटकावले. तर 14 ते 19 वर्ष गटात हाफ ओशनमॅन 5 किमी पोहणे प्रकारात यशवर्धन मोहिते याने कास्य पदकाची कमाई केली आहे. यामुळे या दोघांची पुढील वर्षी होणाऱ्या ओशनमन वर्ल्ड चॅम्पियनशिप 2023 स्पर्धेसाठी देखील निवड झाली आहे. नुकतेच ते दोघेही स्वगृही परतले आहेत. दोघे परत आल्यानंतर कोल्हापुरात त्यांचे जल्लोषी स्वागत स्वागत करण्यात आले.

    FIFA : फुटबॉलपटूंसोबत घ्या जेवणाचा फिल, कोल्हापूरच्या हॉटेलची ‘लय भारी’ थीम, Video

    श्लोक राहुल पांडव हा फक्त 8 वर्ष वयाचा जलतरणपटू आहे. तो कोल्हापुरातील सरनोबतवाडी या ठिकाणी राहतो. राधाबाई शिंदे शाळेत सध्या तो इयत्ता 2 री मध्ये शिक्षण घेत आहे. यशवर्धन अमरीश मोहिते हा देखील 19 वर्षांचा जलतरणपटू आहे. मंगळवार पेठेत राहणारा यशवर्धन हा सेंट झेवियर्स या शाळेचा विद्यार्थी आहे. चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकल्यामुळे एक वेगळाच आनंद झाल्याचे मत दोघांनी व्यक्त केले आहे. या दोघांना नीलकंठ आखाडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. का अवघड असते ओशनमॅन स्पर्धा ? ओशनमॅन आशियायी चॅम्पियनशिप ही एक ओपन वॉटर स्पर्धा असते. साधारणतः जलतरण स्पर्धा या जलतरण तलावात घेतल्या जातात. पण ही चॅम्पियनशिप समुद्रात घेतली जाते. जलतरण तलावात पोहण्यापेक्षा समुद्राच्या पाण्यात पोहणे हे थोडे कठीण असते. वेगळ्या वातावरणात सराव करून तिथे दुसऱ्या देशातील वातावरणात स्पर्धेत उतरणे हे देखील अवघड जात असते. या स्पर्धेसाठी सराव व्हावा म्हणून या दोघांनी सिंधुदुर्ग येथे होणाऱ्या ओपन वॉटर स्विमिंग स्पर्धेत सहभाग घेतला होता, असे त्यांचे मार्गदर्शक अश्विन शिंदे यांनी सांगितले आहे. तर या चॅम्पियशिप स्पर्धेसाठीचा सराव कोल्हापुरातील राजाराम तलाव आणि रमणमळा या ठिकाणी केल्याचे यशवर्धन याने सांगितले आहे. पुढच्या वर्षीच्या स्पर्धेसाठी देखील जोरदार तयार करण्यात येणार असल्याचे मत देखील त्यांनी व्यक्त केले आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात