कोल्हापूर, 03 मार्च : संदीप देशपांडे कोण आहेत ते? कुठे राहतात ते?कोणत्याही नागरिकांवर अशा प्रकारचे हल्ले होणं हे कायद्याने चांगल्या सुव्यवस्थेचे लक्षण नाही, असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर आज सकाळी अज्ञात लोकांनी हल्ला केला आहे. या प्रकरणावर खासदार संजय राऊत यांनी खोचक प्रतिक्रिया दिली. संदीप देशपांडेंवर कोण आहेत ते? कुठे राहतात ते? कोणत्याही नागरिकांवर या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे हल्ले होणं हे कायद्याने चांगल्या सुव्यवस्थेचे लक्षण नाही, कुणी असेल सामन्य कार्यकर्ता असेल, राजकीय कार्यकर्ता असेल. मग उपमुख्यमंत्र्यांनी सांगणं हे सणसनाटी निर्माण करण्यासाठी करत असल्याचे असं सांगणं हे हल्लेखोरांना बळ मिळत आहे, जिथे निवडणुका असेल तिथे जाऊन कायदा आणि सुवस्था हातात घेतली जाते, असं असेल तर आम्हाला सुप्रीम कोर्टात जावं लागेल, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली. (आम्हाला कोणी मोठा भाऊ नाही पण तरीही…, पंकजा मुंडे झाल्या भावुक) हक्कभंग समिती ही पक्षपाती आहे मूळ शिवसेनेचा एकही सदस्य त्यात घेतलेला नाही ज्यांनी तक्रार दिलेली आहे त्यांनाच न्यायाधीश करण्याचा प्रकार केला. मी अजून नोटीस वाचली नाही माझ्या हातात अजून नोटीस पडलेली नाही. माझ्या हातात नोटीस असती तर मी इथून उत्तर देऊ शकलो असतो, इतक्या घाईघाईत कायदेशीर बाबींना उत्तर देता येत नाही मला कायद्याचा अभ्यास करावा लागेल, असंही राऊत म्हणाले. या राज्यात सगळ्याच गोष्टी बेकायदेशीर सुरू असल्यामुळे सरकारच बेकायदेशीरपणे बसलेला आहे. मी विधिमंडळाचा आणि आमदारांचा अपमान होईल असं मी काहीही म्हटलं नाही. एक विशिष्ट गट जो बेकायदेशीरपणे शिवसेना आमची आहे, असं सांगतो आहे त्या गटाबद्दल मी बोललेलो आहे, त्यामुळे हक्कभंग होतो की नाही हे पाहावं लागेल. आज उत्तर नाही दिलं तर मला फासावर लटकवणार आहात का? लटकवा, तुरुंगात टाकून झालं आता फासावर लटकवा, असंही राऊतांनी ठणकावून सांगितलं. (संजय राऊत यांच्यावर शरद पवार नाराज, उद्धव ठाकरेंसमोरच बोलून दाखवलं) नागालँडमध्ये आठवले गटाला जागा मिळाल्या आहे जगातला आश्चर्य आहे. महाराष्ट्रात जरी त्यांना जागा मिळाल्या नसल्या तरी नागालँडच्या भूमीवर त्यांना जागा मिळाल्या मी त्याचा अभिनंदन करतो, असं म्हणत राऊतांनी आठवलेंचं अभिनंदन केलं. धनुष्य नीट उचला, रावणाने देखील धनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला होता हे जरा रामायणातून समजून घ्या. अशी सोंग महाराष्ट्रात चालत नाहीत. त्यांच्या यात्रा म्हणजे सगळ्यात पैशांचा खेळ असतो, असा टोलाही राऊत यांनी शिंदे गटाला लगावला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







