कोल्हापूर, 19 मार्च : राज्यभरात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. रब्बी पिकांना मोठा फटका बसला आहे. गहू, ज्वारी, हरभारा ही पिके जमीनदोस्त झाली आहेत. दुसरीकडे आंबा, केळी आणि द्राक्ष बागांचं देखील मोठं नुकसान झालं आहे. अवकाळीच्या तडाख्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. शासनाच्या मदतीकडे शेतकऱ्याचे डोळे लागले आहेत. शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळाली नसल्यानं संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं पहायला मिळत आहे. त्यांनी ट्विट करत आपला संताप व्यक्त केला आहे.
नेमकं काय म्हटलं संभाजीराजे छत्रपती यांनी?
अवकाळी पावसाच्या फटक्यात शेतकरी भरडून निघाला आहे. शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे. मात्र अद्यापही शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचलेली नाहीये. यावर संताप व्यक्त करताना संभाजीराजे छत्रपती यांनी एक ट्विट केलं आहे. 'अवकाळी पाठोपाठ गारपीटीने शेतकऱ्याला ग्रासले आहे. उभे पीक जमीनदोस्त झाले आहे. अशा परिस्थितीत राज्यसरकारने व कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे असताना सरकार व कृषीमंत्री साधे धीर देतानाही कुठे दिसत नाहीत. इतकी असंवेदनशीलता कुठून येते ? शेतकरी जगला तर तुम्ही जगाल' असं ट्विटमध्ये संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.
अवकाळी पाठोपाठ गारपीटीने शेतकऱ्याला ग्रासले आहे. उभे पीक जमीनदोस्त झाले आहे. अशा परिस्थितीत राज्यसरकारने व कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे असताना सरकार व कृषीमंत्री साधे धीर देतानाही कुठे दिसत नाहीत. इतकी असंवेदनशीलता कुठून येते ? शेतकरी जगला तर तुम्ही जगाल.
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) March 19, 2023
अवकाळीचा फटका
चालू आर्थिक वर्षात कधी कमी तर कधी जास्त पावसामुळे वर्षभर शेतकऱ्याचं नुकसान झालं. निदान आता रब्बीचं तरी पीक हाती येईल अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. मात्र अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतकऱ्यांच्या या आशेवर देखील पाणी फिरलं आहे. पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. गहू, हरभारा, ज्वारी यासारखी पिके जमीनदोस्त झाली आहेत. तर केळी, अंबा, द्राक्ष या सारख्या फळबागांना देखील पावसाचा मोठा फटका बसला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sambhajiraje chhatrapati