कोल्हापूर, 16 मार्च : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आहे आई आणि दहा महिन्यांच्या मुलाची ताटातुट होत असताना एका आईला झालेल्या वेदनांचा. मात्र तरीही आईने आपल्या पुत्र प्रेमापेक्षाही कर्तव्य श्रेष्ठ मानलं ही माता दहा महिन्याच्या मुलाला घरी सोडून बीएसएफमध्ये कर्तव्यावर रूजू झाली आहे. ड्युटीवर जॉईन होण्यासाठी रेल्वेत बसताना त्यांच्या जीवाची जी घालमेल झाली ती सर्व या व्हिडीओमधून दिसून येत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल असाच हा व्हिडीओ आहे. देशसेवा महत्त्वाची कोल्हापूर जिल्ह्यातल्या नंदगाव इथल्या वर्षाराणी पाटील या दहा महिन्याच्या मुलाला घरी सोडून बीएसएफमध्ये दाखल झाल्या. रेल्वे स्टेशनवरून ड्युटीवर हजर होताना त्यांच्या जीवाची चांगलीच घालमेल झाली. आईपण बाजूला ठेऊन मातृभूमीच्या रक्षणासाठी त्या निघून गेल्या. त्यांचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. त्यांचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं आहे.
आई होणे सोपे नसते
— Dnyaneshwar salokhe (@Dnyaneshwarkop) March 16, 2023
कोल्हापूर जिल्ह्यातल्या नंदगाव इथल्या वर्षाराणी पाटील या दहा महिन्याच्या मुलाला घरी सोडुन बीएसएफ मध्ये दाखल झाल्या. ड्युटी वर हजर होताना त्यांच्या जीवाची चांगलीच घालमेल झाली.या हृदयस्पर्शी व्हिडीओने अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं.#bsf #soilder #kolhapur #realhero pic.twitter.com/2b6NJQUsk9
डोळ्यात पाणी आणणारा व्हिडीओ वर्षाराणी पाटील या बीएसएफमध्ये कार्यरत आहेत. त्यांचा मुलगा अवघा दहा महिन्यांचा आहे. बाळाला सर्वाधिक गरज ही त्याच्या आईची असते. मात्र अशाही परिस्थितीमध्ये वर्षाराणी पाटील या आपल्या मुलाला घरी ठेवून कर्तव्यावर रूजू झाल्या आहेत. रेल्वेमध्ये बसताना त्यांचं मन आपल्या मुलाच्या आठवणीनं भरून आलं. मात्र या मातेने पुत्रप्रेम बाजुला सारत देशसेवेला प्राधान्य दिलं. त्यांच्या या कर्तव्यनिष्ठेचं राज्यभरातून कौतुक होत आहे.

)







