जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'उर्मटपणा म्हणजे नेतृत्त्व नाही', सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंना सणसणीत टोला

'उर्मटपणा म्हणजे नेतृत्त्व नाही', सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंना सणसणीत टोला

'उर्मटपणा म्हणजे नेतृत्त्व नाही', सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंना सणसणीत टोला

‘15-20 वर्षांपूर्वीचे व्हिडीओ मनसे आता काढत आहे. मनसेकडे मुळात जाणते नेतृत्व नाही.

  • -MIN READ Kolhapur,Maharashtra
  • Last Updated :

कोल्हापूर, 16 नोव्हेंबर : ‘15-20 वर्षांपूर्वीचे व्हिडीओ मनसे आता काढत आहे. मनसेकडे मुळात जाणते नेतृत्व नाही. उर्मटपणाला नेतृत्व म्हणत नाहीत. उद्धव ठाकरेंकडे  सुसंस्कृतपणा आहे, असं म्हणत  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा  अंधारे यांनी पहिल्यांदाच मनसेवर टीकास्त्र सोडले. तसंच, देवेंद्र फडणवीस यांना विनयभंगाची व्याखा शिकवावी लागेल, असा टोलाही अंधारे यांनी लगावला. सुषमा अंधारे कोल्हापूरच्या दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. राज्यातील घडामोडी आणि शिंदे सरकारवर जोरदार टीकाही केली. ‘2023 ला मध्यवधी निवडणुका लागतील, भाजपमध्ये धुसफुस सुरू आहे. बाहेरून आलेल्यांना स्पेस दिला जातो यातून खदखद सुरू आहे. त्यामुळे निवडणुका लागण्याची शक्यता आहे. पंकजा मुंडे यांना मानणारा वर्ग भाजपवर नाराज आहे. याचे परिणाम भोगावे लागणार आहे शिंदे गटातही मंत्रिपदाची आमिषे पूर्ण होत नाहीत. संजय शिरसाट नाराज आहेत,तसे इतरही नाराज आहेत. भाजपने शिंदे गटाला संपवण्याचे धोरण सुरू केले आहे, अशी टीका अंधारे यांनी केली. ‘15-20 वर्षांपूर्वीचे व्हिडीओ मनसे आता काढत आहे. मनसेकडे मुळात जाणते नेतृत्व नाही. उर्मटपणाला नेतृत्व म्हणत नाहीत. उद्धव ठाकरेंकडे सुसंकृतपणा आहे, असं म्हणत अंधारे यांनी पहिल्यांदाच मनसेवर टीकास्त्र सोडले. (शिंदे गटाला मोठं गिफ्ट, केंद्रात मिळणार 2 मंत्रिपद, राज्यपालपदांचीही मागणी?) ‘सूडबुद्धीने भाजप राजकारण खेळत आहे. सेनेच्या मतदारसंघावर भाजप हक्क सांगत आहे. श्रीकांत शिंदे यांच्या मतदार संघातही शिरकाव सुरू आहे. एकनाथ शिंदे यांची जाणीवपूर्वक इमेज डाऊन करण्याचा प्रयत्न टीम फडणवीस करत आहे. मराठा नेतृत्व दिले पण त्यांना बुद्धांक नाही हे दाखवून देण्याचा हा प्रयत्न आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे नेतृत्वक्षमता नाही हे दाखवून देण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा दावाही अंधारे यांनी केला. ‘उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची भेट होणार होती. पण आता ती रद्द झाली आहे.  वंचितकडून युतीचा अजिबात प्रस्ताव नाही. त्यामुळे अजून अशी वंचित आघाडीसोबत युतीची अशी चर्चा नाही. शिंदे गटाचे कोणी परत आले तर त्यांच्यासाठी आम्ही दोर कापले नाहीत, असंही अंधारे म्हणाल्या. ( विनायक मेटे कार अपघात प्रकरणाला नवे वळण, सीआयडीची मोठी कारवाई ) ‘मी शिवबंधन सोडते आणि किरीट सोमय्यांचा दोरा बांधते. अनिल परब यांचा बंगला दूर आहे, नारायण राणेंच्या बंगल्यावर का कारवाई होत नाही. बीकेसीच्या मेळाव्याला पैसा आला कुठून? भावना गवळीना कोणते वाशिंग मशीन वापरले. भावना गवळी प्रकरणात ईडीने अद्यापही चार्जशीट दाखल केलेली नाही, असा सवालही अंधारे यांनी उपस्थितीत केला. ‘फडणवीस तुम्ही भाजपा आणि शिंदे गटाचे गृहमंत्री नाही तुम्ही राज्याचे गृहमंत्री आहात. अंबाबाई मंदिरात पुजारी ताई सरका म्हणून पुढे ढकलतो तर त्याला विनयभंग म्हणणार का? कंडक्टर महिलांना पुढे सरका म्हणतात त्याला विनयभंग म्हणणार का? देवेंद्र यांना विनयभंगाची व्याख्या शिकवण्याची गरज आहे, असा टोलाही अंधारे यांनी लगावला. ’ बदला घेणे जातीचे अभिमान बाळगणे अशी विधाने करून अमृता  फडणवीस स्वतःसाठी खड्डे तयार करत आहेत. जातीचा माज आणि लाज नसावी कर्तृत्वावर स्वतःला सिद्ध करावे, असा टोलाही अंधारे यांनी लगावला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात