जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / शिंदे गटाला मोठं गिफ्ट, केंद्रात मिळणार 2 मंत्रिपद, राज्यपालपदांचीही मागणी?

शिंदे गटाला मोठं गिफ्ट, केंद्रात मिळणार 2 मंत्रिपद, राज्यपालपदांचीही मागणी?

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे मागणी केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे मागणी केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे मागणी केली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 16 नोव्हेंबर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये बंडखोरी करून भाजपसोबत सरकार स्थापन केले. शिंदे आणि फडणवीस सरकारला आता 4 महिने पूर्ण होत आहे. लवकरच शिंदे गटाला आता केंद्रातून 2 मंत्रिपद आणि 2 राज्यपाल पद मिळण्याची शक्यता आहे. शिंदे गटाने याबाबत तशी भाजपकडे मागणी केली असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे मागणी केली आहे. या मागणीवर आज अमित शहा अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे कीर्तिकर यांना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. याआधीही शिंदे गटाने केंद्राकडे मंत्रिमंडळात पदाची मागणी केली होती. (Eknath Shinde : शिंदे गटातील आमदार नाराज? मुख्यमंत्री शिंदेंची बंद दाराआड आमदारांची मनधरणी) दरम्यान, बाळासाहेबांची शिवसेना गटामध्ये इन्कमिंग सुरूच आहे. आता सोलापुरात मुख्यमंत्री शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमहापौर दिलीप कोल्हे आज शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला हा मोठा धक्का मानला जात आहे. सोलापूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटाने शिवसेना आणि राष्ट्रवादीला खिंडार पाडण्याचे काम सुरू केले आहे. शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते आधीच शिंदे गटात सामील झाले आहे. आता राष्ट्रवादीचे नेतेही प्रवेश करत आहे. (हे ही वाचा :  न्यायालयाचे निवडणूक आयोगाला निर्देश, दोन्ही गटांसाठी ही तारीख ठरणार महत्त्वाची ) राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमहापौर दिलीप कोल्हे आज शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज संध्याकाळी सात वाजता वर्षा निवासस्थानी प्रवेश होणार आहे. दिलीप कोल्हे हे शरद पवारांचे अत्यंत विश्वास मांणले जात होते. दिलीप कोल्हे आपल्या कार्यकर्त्यांसह आता मुंबईला निघाले आहेत. पक्षातील स्थानिक नेतृत्वांना कंटाळून दिलीप कोल्हे यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून दिलीप कोल्हे आपल्या समर्थकांसह मुंबईला रवाना झाले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात