जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / एक फोन अन् मंदिर रिकामं , भाविकांमध्ये घबराट, कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नेमंक काय घडलं?

एक फोन अन् मंदिर रिकामं , भाविकांमध्ये घबराट, कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नेमंक काय घडलं?

एक फोन अन् मंदिर रिकामं , भाविकांमध्ये घबराट, कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नेमंक काय घडलं?

कोल्हापूरच्या अंबाबाईचं मंदिर हे महाराष्ट्रातच नव्हे तर देशात प्रसिद्ध आहे. देशभरातून भाविक अंबाबाईच्या दर्शनला येतात. मात्र आज एका फोनमुळे या भाविकांची काही काळ चांगलीच धावपळ उडाली.

  • -MIN READ Kolhapur,Kolhapur,Maharashtra
  • Last Updated :

कोल्हापूर :  महत्त्वाची ठिकाणं नेहमीच विघातक शक्तिंच्या टार्गेटवर असतात. अशा ठिकाणी असा एखादा प्रसंग उद्धभवला तर पोलीस यंत्रणा किती सज्ज आहे?  हे पाहण्यासाठी पोलिसांकडून मॉक ड्रिल करण्यात येते.  कोल्हापूरच्या अंबाबाईचं मंदिर हे महाराष्ट्रातच नव्हे तर देशात प्रसिद्ध आहे. देशभरातून भाविक अंबाबाईच्या दर्शनला येतात. मात्र आज एका निनावी धमकीच्या फोनमुळे या भाविकांची काही काळ चांगलीच धावपळ उडाली.  पोलिसांनी संपूर्ण मंदिर रिकामं केलं. भाविकांमध्ये घबराटीचे वातावरण पहायला मिळाले. मात्र त्यानंतर हे मॉक ड्रिल सुरू होतं असं पोलिसांनी सांगितल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. एक फोन अन् मंदिरात गोंधळ    घटनेबाबत अधिक माहिती अशी की, आज अंबाबाई मंदिरात अचानक एक धमकीचा निनावी फोन आला. त्यानंतर थोड्याचवेळात पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालं. पोलिसांनी मंदिर रिकामं केलं. भाविकांना बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर पोलिसांकडून मंदिराची तपासणी करण्यात आली. अचानक सुरू झालेल्या या प्रकारामुळे भाविकांची मात्र चांगलीच धावपळ उडाली. भाविक गोंधळून गेले, त्यांच्यामध्ये घबराटीचं वातावरण पसरलं. मात्र हे मॉक ड्रिल होतं असा पोलिसांनी खुलासा करताच सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. हेही वाचा :   कंटेनर भरून खोके कुणी पचवले, एकदिवस…, एकनाथ शिदेंचं उद्धव ठाकरेंना जशास तसे उत्तर भाविकांनी सोडला सुटकेचा निश्वास   दर्शनासाठी आलेले भाविक हा सर्व थरार जवळून पहात होते.  पोलिसांनी अचानक मंदिराची तपासणी सुरू केल्यानं भाविकांमध्ये गोंधळ उडाला, घबराटीचे वातावरण पसरले. मात्र त्यानंतर हे सर्व मॉक ड्रील सुरू होतं  अशी माहिती पोलिसांकडून देताच भाविकांनी सुटकेच निश्वास सोडला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: kolhapur
  • First Published :
जाहिरात
जाहिरात