मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /कोल्हापुरात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू होता भलताच प्रकार, दोघांना अटक

कोल्हापुरात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू होता भलताच प्रकार, दोघांना अटक

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

Crime in Kolhapur: कोल्हापुरातील ताराराणी चौकानजीक निंबाळकर कॉलनीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा शाहूपुरी पोलिसांनी पर्दाफाश (Sex racket exposed) केला आहे. छापेमारीत पोलिसांनी एका महिलेसह दोघांना अटक केली आहे.

कोल्हापूर, 16 फेब्रुवारी: कोल्हापुरातील (Kolhapur) ताराराणी चौकानजीक निंबाळकर कॉलनीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा शाहूपुरी पोलिसांनी पर्दाफाश (Sex racket exposed) केला आहे. याठिकाणी छापेमारी करत पोलिसांनी एक महिलेसह दोघांना अटक (2 Accused arrested) केली आहे. संबंधित दोन्ही आरोपी मसाज पार्लरच्या (massage parlor)नावाखाली वेश्याव्यवसाय चालवत होते. याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर शाहूपुरी पोलिसांनी संबंधित ठिकाणांवर छापेमारी करत दोघांना अटक केली आहे. तसेच काही महिलांची सुटका केली आहे. या घटनेचा पुढील तपास शाहूपुरी पोलीस करत आहेत.

परमेश्वर गणपती सूर्यवंशी (वय-55)  आणि ज्योती मारुती मिसाळ (28) असं अटक केलेल्या आरोपींची नावं आहे. दोन्ही आरोपी हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली येथील रहिवासी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सूर्यवंशी आणि मिसाळ यांनी निंबाळकर कॉलनीतील गुरुकृपा अपार्टमेंटमध्ये भागीदारीमध्ये 'गुडलक' नावाचं मसाज पार्लर सुरू केलं होतं. या मसाज पार्लरमध्ये काही महिलांना ठेवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेतला जात होता.

हेही वाचा-शिक्षिकेनं विद्यार्थ्यांच्या कपकेकमध्ये टाकली किळसवाणी गोष्ट, 41 वर्ष तुरुंगवास

पण याची गुप्त माहिती शाहूपुरी पोलिसांना मिळाली. गुप्त माहितीच्या अधारे पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापेमारी केली. यावेळी पोलिसांना आरोपींसह अन्य काही पीडित महिला त्याठिकाणी आढळल्या आहेत. यावेळी पोलिसांनी वेश्याव्यवसायात गुंतलेल्या काही महिलांची सुटका केली आहे. तसेच मसाज पार्लर चालक परमेश्वर सूर्यवंशी आणि ज्योती मिसाळ यांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी अवैध वेश्याव्यवसाय चालवण्यासोबतच अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा-कर्ज वसुलीसाठी कंपनीचं घृणास्पद कृत्य; अश्लील फोटो VIRAL होताच तरुणानं दिला जीव

या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयाने त्यांना 18 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दोन्ही आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. या घटनेचा पुढील तपास शाहूपुरी पोलीस करत आहेत.

First published:
top videos

    Tags: Crime news, Kolhapur, Sex racket